घरक्रीडासेहवागचे शतक होऊ नये म्हणून नो-बॉल टाकणारा श्रीलंकन गोलंदाज आता चालवतोय ऑस्ट्रेलियात बस

सेहवागचे शतक होऊ नये म्हणून नो-बॉल टाकणारा श्रीलंकन गोलंदाज आता चालवतोय ऑस्ट्रेलियात बस

Subscribe

तो २०११ एकदिवसीय वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीलंकन संघाचा भाग होता.

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला २०१० मध्ये एकदिवसीय सामन्यात शतकापासून रोखण्यासाठी मुद्दाम नो-बॉल टाकणारा श्रीलंकेचा ऑफस्पिनर सुरज रणदीव आता ऑस्ट्रेलियात बस चालकाचे काम करत आहे. रणदिवने १२ कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून श्रीलंकेसाठी ८६ विकेट घेतल्या होत्या. तसेच तो २०११ एकदिवसीय वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीलंकन संघाचा भाग होता. मात्र, त्याने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आता तो ऑस्ट्रेलियामध्ये बस चालकाचे काम करत आहे. रणदीवसोबतच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू चिंथका नमस्ते आणि झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज वेडिंग्टन एमवायेंगा हे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही मेलबर्न येथे बस चालवत आहेत.

स्थानिक क्रिकेट क्लबसाठीही खेळतो

रणदीव हा २०१९ पासून ऑस्ट्रेलियात राहत असून तो बस चालवण्याबरोबरच एका स्थानिक क्रिकेट क्लबसाठीही खेळतो. त्याने २०१९ मध्ये स्थानिक श्रीलंकन क्रिकेटमधील आपला अखेरचा सामना खेळला होता. आता तो मेलबर्नमधील दांडेनॉंग क्रिकेट क्लबकडून जिल्हास्तरीय क्रिकेट खेळतो. हा क्लब व्हिक्टोरिया प्रीमियर क्रिकेटशी संलग्न असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतो. याच क्लबकडून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू जेम्स पॅटिन्सन आणि पीटर सीडेलही खेळतात.

- Advertisement -

मुद्दाम नो-बॉल टाकला

रणदीवने २०१० साली दाम्बुला येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर सेहवागला शतक करण्यापासून रोखले होते. सेहवाग ९९ धावांवर नाबाद असताना भारताला जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता होती. त्यावेळी सेहवागला शतकापासून रोखण्यासाठी रणदीवने मुद्दाम नो-बॉल टाकला होता. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -