घरताज्या घडामोडीमुद्रांक चोरीप्रकरणी तो कर्मचारी निलंबित

मुद्रांक चोरीप्रकरणी तो कर्मचारी निलंबित

Subscribe

पुण्याच्या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू

देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकाच्या आधारे फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुद्रांक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने मुद्रांक विभागाला प्राप्त तक्रारीनुसार त्यासंबधीची कागदपत्रे पुण्याला मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक आयजीआर कडे नेली जात असतांना गाडीच्या काचा फोडून ही कागदपत्रे चोरीला गेली आहेत याप्रकरणी ही कागदपत्रे पुण्याला पोहचविण्याची जबाबदारी असलेल्या लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे.

देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्तऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी नाशिकचा मुद्रांक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देवळयाप्रमाणेच मालेगावसह अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभुमीवर तब्बल ४० हजार दस्त तपासून घेण्याचे काम सुरूच असताना आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयातील काही महत्वपुर्ण कागदपत्रे पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे (आयजीआर) घेऊन जात असताना चोरीला गेल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. कारची काच फोडून ही कागदपत्रे चोरीस गेल्याचे संबंधित कर्मचार्‍याकडून सांगितले गेल्याने प्रशासनाच्याही भुवया उंचावल्या आहेत. महत्वपूर्ण कागदपत्रे पुण्यात पोहोच करण्यासाठी विश्वासाने संबंधित कर्मचार्‍याकडे सुपुर्द करण्यात आली होती. ती काळजीने पोहोच करणे ही या कर्मचार्‍याची जबाबदारी होती. परंतु ही महत्वपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित न सांभाळल्याने त्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाकडून मला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज माढरे यांनी बुधवारी सांगितले.

- Advertisement -

सदरच्या प्रकरणात संबधित कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. मुद्रांक विभागाच्या कार्यालयीन बाबींबाबत मी अधिक बोलु शकत नाही.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सध्या मी या विषयावर काहीही बोलू शकत नाही.
कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -