घरक्रीडाआणि 'त्याने' फिफा वर्ल्डकप ट्रॉफीसोबत केली आंघोळ

आणि ‘त्याने’ फिफा वर्ल्डकप ट्रॉफीसोबत केली आंघोळ

Subscribe

यंदाचा फिफाचा सीझन खास होता. कारण पहिल्यांदाच क्रोएशिया फायनलमध्ये आली होती. फ्रान्सने ४ गोल करत क्रोएशियावर मात केली आणि फ्रान्सने पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफिवर आपले नाव कोरले

फ्रान्स आणि क्रोएशियासोबत रंगलेली फिफा मॅच आजही फिफाच्या चाहत्यांच्या लक्षात असेल. फायनलमध्ये फ्रॅन्सने बाजी मारत ट्रॉफी पटकावली आणि जगज्जेता झाले. पण या विजयाचा आनंद आजही फ्रॉन्सचे खेळाडू घेत आहे. फ्रान्सचा खेळाडू सॅम्युअल उमटीटी याने चक्क आंघोळ केली आहे. आणि हा फोटो शेअर करत त्याने हा आनंद त्याच्या फॅनसोबत शेअर केला आहे.

फोटो केला शेअर

हा खास फोटो सॅम्युअल उमटीटी त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याने फ्रेंचमध्ये यावर मेसेज तिला आहे. त्याचा अर्थ असा आनंदाचा क्षण आवडत्या (ट्रॉफी)सोबत महत्त्वाचा होता, असे त्याने म्हटले आहे. या फोटोत त्याचे निखळ हास्य आणि वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी घेतलेली मेहनत फळाला आल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

- Advertisement -

असा झाला होता सामना

यंदाचा फिफाचा सीझन खास होता. कारण पहिल्यांदाच क्रोएशिया फायनलमध्ये आली होती. फ्रान्सने ४ गोल करत क्रोएशियावर मात केली. तरीदेखील क्रोएशियाच्या टीमचे देखील कौतुक झाले.

दुसऱ्यांदा मिळवली ट्राफी

फ्रान्सचा संघ १९९८ पासून तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला. १९९८ साली ब्राझीलवर ३-० असा दमदार विजय मिळवत फ्रान्सने विश्वचषक पटकावला. त्यानंतर २००६ साली पुन्हा एकदा फ्रान्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला मात्र इटलीने त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ ने पराभूत करत विजय मिळवला. २००६ नंतर थेट २०१८ मध्ये क्रोएशियाला पराभूत करत फ्रान्सने विजयश्री पुन्हा खेचून आणली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -