घरक्रीडाविराट कोहली कर्णधार म्हणून अपयशी - गौतम गंभीर

विराट कोहली कर्णधार म्हणून अपयशी – गौतम गंभीर

Subscribe

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणता येईल. विराट कोहलीचा यशस्वी खेळाडूंचा परिपूर्ण असा संघ आहे यात शंका नाही. मात्र कर्णधार म्हणून विराट कोहलीने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. इतकेच नाही तर आयपीएलमध्ये स्पर्धा दोखील जिकलेली नाही आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने त्याच्या कर्णधारपदाच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिला क्रमांकावर घेऊन जाणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाता आलं नाही. लीग टप्प्यात भारतीय संघाने सर्व संघांपेक्षा चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. परंतु न्यूझीलंडने अंतिम सामन्यात पोहोचण्याचं भारताचं स्वप्न भंग केलं. कोहलीच्या नेतृत्वाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, विराट कोहलीला अजून बरंच काही साध्य करायचं आहे.

- Advertisement -

स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेटमध्ये गौतम गंभीर म्हणाला की, “हा एक सांघीक खेळ आहे. तुम्ही स्वत: च्या धावा करू शकता. ब्रायन लारासारखे बरेच लोक आहेत ज्यांनी बऱ्याच धावा केल्या आहेत. जॅक कॅलिससारखे लोक आहेत ज्यांनी काहीही जिंकलेलं नाही. खरं सांगायचं झालं तर विराट कोहलीने सध्या कर्णधार म्हणून काहीही जिंकलेलं नाही. त्याला अजून बरंच काही साध्य करायचं आहे.”


हेही वाचा – भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, कोणीही तोडू शकणार नाही – राजनाथ सिंह

- Advertisement -

विराट कोहली २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता आणि नंतर २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. तथापि, दोन्ही स्पर्धांवेळी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. कोहलीच्या नेतृत्वात, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. तर गेल्या वर्षी वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य फेरीत संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यशस्वी कर्णधार बनण्यासाठी आयसीसीची मोठी ट्रॉफी जिंकली पाहिजे, असं गंभीरने म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -