घरक्रीडाHockey World Cup 2018 : अर्जेन्टिनाची स्पेनवर मात

Hockey World Cup 2018 : अर्जेन्टिनाची स्पेनवर मात

Subscribe

अर्जेन्टिनाने आपल्या पहिल्या सामन्यात स्पेनचा ४-३ असा पराभव केला.

हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाने रोमांचक सामन्यात स्पेनचा ४-३ असा पराभव केला. अर्जेन्टिनाकडून अगुस्टीन मझ्झील्ली आणि गोंझालो पिल्लेट यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

दोन्ही संघांची आक्रमक सुरुवात 

या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. तिसऱ्या मिनिटाला एनरिके गोंझालेसने गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवली. तर पुढच्याच मिनिटाला अगुस्टीन मझ्झील्लीने गोल करत अर्जेन्टिनाला १-१ अशी बरोबरी करून दिली. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला पेपे रोमेयुने स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर पुढच्याच मिनिटाला मझ्झील्लीने आपला आणि अर्जेन्टिनाचा दुसरा गोल केला. पहिले सत्र संपणार इतक्यातच गोंझालो पिल्लेटने गोल करत अर्जेन्टिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यंतराला अर्जेन्टिनाने आपली आघाडी कायम ठेवली.

पिल्लेटचा मॅचविनिंग गोल   

मध्यंतरानंतर स्पेनने अधिक आक्रमक सुरुवात केली. याचा फायदा त्यांना ३५ व्या मिनिटाला झाला. रुईजने गोल करत स्पेनला ३-३ अशी बरोबरी करून दिली. तर सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोंझालो पिल्लेट गोल करत अर्जेन्टिनाला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत अर्जेन्टिनाने हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -