घरक्रीडागंभीर म्हणतो 'या' खेळाडूसाठी जीवही देईन

गंभीर म्हणतो ‘या’ खेळाडूसाठी जीवही देईन

Subscribe

गंभीरने कुंबळेच्या नेतृत्त्वावर स्तुतीसुमने उधळत कुंबळेसाठी जीवही द्यायला तयार आहे असं म्हटलं आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखला जातो. गंभीरने क्रिकेट सोडून राजकारणी झालेला आहे. माजी फलंदाज गंभारने क्रिकेटशी संबंधित अनेक विषयांवर उघडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच माजी दिग्गज फिरकीपटू आणि कर्णधार अनिल कुंबळे यांच्या नेतृत्व कौशल्याची अनेक वेळा प्रशंसा केली आहे. कुंबळेने थोड्या काळासाठी भारतीय कसोटी संघाची कमान घेतली. गंभीरने कुंबळेच्या नेतृत्त्वावर स्तुतीसुमने उधळत कुंबळेसाठी जीवही द्यायला तयार आहे असं म्हटलं आहे.

तथापि, २००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा, २००७ मध्ये पाकिस्तान सोबतचा दौरा आणि श्रीलंकेचा दौरा, अशा कठीण मालिकेत कुंबळेने भारतीय संघाचं नेतृत्व केल. भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळेला जेव्हा भारतीय संघ बदलत होता तेव्हा संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बरेच सहकारी कुंबळेच्या नेतृत्व कौशल्यांचं कौतुक करतात.

- Advertisement -


हेही वाचा – ‘या’ खेळाडूने केला होता तीन वेळा आत्महत्येचा विचार

- Advertisement -

गौतम गंभीरने २००८ ची घटना आठवून कुंबळे खेळाडूंचं किती समर्थन करतो याचा दाखला दिला आहे. गंभीर म्हणाला की, २००८ मध्ये कुंबळेने वीरेंद्र सेहवाग आणि त्याच्यावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या महत्त्वपूर्ण घरच्या मालिकेत विश्वास ठेवला होता. गंभीर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला, “जेव्हा मी आणि सेहवाग जेवण घेत होतो तेव्हा कुंबळे आला आणि म्हणाला की काहीही झाले तरी तुम्ही दोघेही संपूर्ण मालिकेत ओपनिंग करणार आहात. तुम्ही खातं न उघडता ८ डावांमध्ये बाद झालात तरी काही फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात कोणाच्या तोंडून असे शब्द कधी ऐकले नव्हते. म्हणून मला एखाद्यासाठी आपला जीव द्यावा लागला तर तो अनिल कुंबळेसाठी देईन. ते शब्द आजही माझ्या हृदयात आहेत.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -