घरक्रीडाविराट कोहलीचं सध्याचं वागणं आवडलं नाही - मायकल हसी

विराट कोहलीचं सध्याचं वागणं आवडलं नाही – मायकल हसी

Subscribe

विराट कोहली खेळताना एका वेगळ्याच आवेशात असतो, त्याचं सध्याच वागणं काही रुचण्यासारख नाही, असं मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मायकल हसी यांनी व्यक्त केलं.

भारतीय क्रिकेट संघाच कर्णधार विराट कोहली सध्या वर्तणुकीसाठी खुपच चर्चेत आहे. विराट कोहली खेळताना एका वेगळ्याच आवेशात असतो, त्याचं सध्याचं वागणं काही रुचण्यासारख नाही, असं मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मायकल हसी यांनी व्यक्त केलं आहे. कोहली हा नियंत्रणात राहत नाही. मला त्याचा सध्याचा अॅटिट्यूड अजिबात आवडलेला नाही. मला वाटत नाही की मी अशा पद्धतीने टीम हँडल करणारा कर्णधार कधी पाहिला आहे. नुकतंच भारताला ऑस्ट्रेलिया विरोधातील सामन्यात पराभव पत्करावा लागला असून ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शहा यांनीदेखील त्याच्या वर्तणुकीवर टिप्पणी केली आहे. त्यामुळे विराटच्या वागण्या-बोलण्यावर चहुबाजूंनी टीका होत असल्याचे यातून समजते.

वाचा : विराट हा जगातील सर्वात उद्धट खेळाडू – नसिरुद्दीन शाह

- Advertisement -

काय म्हणाले होते नसिरुद्दीन

विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाजच नाही, तर सर्वात वाईट वर्तन करणारा खेळाडूही आहे. त्याचा उद्धटपणा आणि वाईट वर्तन हे निव्वळ त्याच्या क्रिकेटमधील हुकूमतीमुळे झाकोळलं जातं आणि देश सोडून जाण्याचे माझे कोणतेही विचार नाहीत.

- Advertisement -

वाचा : पर्थ कसोटीत भारताचा १४६ धावांनी पराभव

पर्थ कसोटीत भारताचा पराभव

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला आहे. पर्थ कसोटीमध्ये भारताचा १४६ धावांनी पराभव झाल्यानं मालिकेत ऑस्ट्रेलियानं मालिकेत १ – १ अशी बरोबरी साधली आहे. भारताचा दुसरा डाव केवळ १४० धावांमध्ये आटोपला. २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ अवघ्या १४० धावांमध्ये तंबुत परतला. आस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराबच झाली. के. एल. राहुल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरान फलंदाज बाद होत गेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -