घरदेश-विदेशभाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष

भाजप ठरला सर्वात श्रीमंत पक्ष

Subscribe

देशातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष देखील ठरला आहे. कारण भारतीय जनता पक्षाची २०१७ - १८ सालची संपत्ती ही १,०२७ कोटी रूपये झाली आहे.

देशातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष देखील ठरला आहे!! विश्वास बसत नाही का? तर, हो भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. कारण भारतीय जनता पक्षाची २०१७ – १८ सालची संपत्ती ही १,०२७ कोटी रूपये झाली आहे. देणगीच्या रूपानं मिळालेली सारी रक्कम आहे. देशातील सात पक्षांची तुलना करता भारतीय जनता पक्षानं सर्वात श्रीमंत पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सपा, बसपा, एनसीपी, एआयटीसी आणि सीपीआयची तुलना करता भारतीय जनता पक्षाची संपत्ती ही ८५ टक्क्यांनी जास्त आहे. इलेक्शन बाँडच्या रूपानं देखील भाजपला ९८९ कोटी रूपये मिळाले आहेत. २०१७ – १८ या आर्थिक वर्षात ही रक्कम भाजपला मिळाली आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत पक्ष होण्याचा मान देखील भाजपला मिळाला आहे.

भाजपशी तुलना करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणारी देणगी आणि खर्चाचा ताळमाळ यामध्ये बरीच तफावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणारी देणगी ही ८.१५ कोटी आहे. तर, खर्च मात्र ८.८४ कोटी रूपये आहे. त्यामुळे मिळणाऱ्या देणग्यांची तुलना करता ६९ लाखांचा खर्च हा जास्त आहे. सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या खर्चाचा ताळेबंद, मिळणाऱ्या देणग्यांची माहिती सादर केली आहे. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या आर्थिक स्थितीची माहिती समोर आली.

- Advertisement -

या साऱ्या गोष्टीमध्ये काँग्रेसच्या देणगीबद्दल मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. भाजपला मिळालेल्या देणगीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र भाजपवर कर चोरीचा आरोप केला आहे. भाजपला निवडणूक बॉंडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -