घरक्रीडाWomen's World Cup 2022: विश्व चषकात ९ खेळाडूंसोबत खेळू शकतो संघ, ICCचा...

Women’s World Cup 2022: विश्व चषकात ९ खेळाडूंसोबत खेळू शकतो संघ, ICCचा नवीन नियम

Subscribe

महिला विश्व चषक २०२२ च्या सामन्यापूर्वी आयसीसीने नियमांमध्ये बदल केला आहे. संघातील बऱ्याच खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे. यामुळे आता आयसीसीने नियमांमध्ये बदल करुन जर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर संघ ९ खेळाडूंसह मैदानात उतरु शकतो. कोरोनाच्या अडथळ्यामुळे मालिका थांबू नये यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आयसीसीने ठरवलं आहे की, जर दोन्ही संघामध्ये सामना अनिर्णित ठरल्यास एक सुपर ओव्हर घेण्यात येईल आणि त्याद्वारे निकाल जाहीर करण्यात येईल. जर सुपर ओव्हरदरम्यान धावसंख्या बरोबरीची झाल्यास पुन्हा एक सुपर ओव्हर घेण्यात येईल आणि सामन्यात संघ जिंकत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर होत राहणार असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

यापूर्वी अंडर-१९ विश्व चषकादरम्यान भारताचा अर्धा संघ कोरोनाबाधित झाला होता. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच मुश्किलीने भारताने आपला संघ मैदानावर उतरवला होता. यादरम्यान भारतीय संघाला युगांडा आणि आयरलँडसारख्या संघासोबत खेळायचे होते. यामुळे भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले होते. परंतु महिला विश्व चषकामध्ये असे होणार नाही. अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी आयसीसीने सर्व संघांसाठी नव्या नियमांची घोषणा केली आहे. महिला विश्व चषक चार मार्चपासून ते तीन एप्रिलपर्यंत न्यूझीलँडमध्ये होणार आहे.

- Advertisement -

आयसीसी इवेंटचे हेड क्रिस टेटली म्हणाले की, कोरोना परिस्थिती पाहता आपल्याला अधिकचू सूट देणे गरजेचे आहे. खासकरुन जेव्हा आपण कठिण परिस्थितीमध्ये सामने खेळत असू. विश्व चषकामध्ये अधिकृत खेळाडूंची संख्या १५ सदस्यांची आहे. परंतु आरक्षित म्हणून संघात अनेक खेळाडूंना संघाशी जोडण्याची मुभा आहे. अशामध्ये जर कोणत्या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर आरक्षित असलेल्या खेळाडूंना संघात समील करण्यात येऊ शकते. मालिकेत सर्व संघ एक-एक सामना खेळतील यामध्ये चार संघांबाबत निर्णय घेण्यात येईल.

जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि दोन संघांमधील सामना आयोजित करणं कठिण होत असेल तर त्या संघांमधील सामन्यांचे आयोजन नंतर करण्यात येईल. प्रत्येक संघाकडून अपेक्षा असते की मैदानावर लवचीकता दिसावी. या खेळात चौकारांच्या संख्येच्या आधारावर विजेता संघाचा निर्णय होणार नाही जसे २०१९ च्या विश्वचषकामध्ये करण्यात आले होते. कोणत्याही सामन्यात निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत सुपर ओव्हार खेळवून सामना सुरुच राहणार असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IND W VS NZ W: स्मृती मंधानाने शानदार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला मिळवून दिला विजय, मग म्हणाली…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -