घरक्रीडाICC Men's T20 World Cup : युझवेंद्र चहलला संघातून का डावललं?, कोहलीने...

ICC Men’s T20 World Cup : युझवेंद्र चहलला संघातून का डावललं?, कोहलीने सांगितलं त्यामागील कारण

Subscribe

टी-२० विश्वचषक स्पर्धेचे बिगुल रविवारी वाजले असून सप्टेंबरमध्ये भारतीय संघ जाहीर झाला. यामध्ये फिरकीपटू युझवेंद्र चहल याला डावलल्याने बरीच चर्चा झाली होती. यावर आता भारताचा कर्णधार याने स्पष्टीकरण देताना युएईच्या खेळपट्ट्यांवर चहलपेक्षा राहुल चहर उजवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुढे बोलताना विराटने चहलला टी-२० विश्वचषक संघाबाहेर ठेवणे हा एक कठीण निर्णय होता, अशी कबुली दिली.

युएईच्या संथ खेळपट्ट्यांवर थोडी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या राहुल चहरची संघात निवड झाली. चहलला डावलून चहरला संघात घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. चहलला का डावलले यासंदर्भात स्पष्टीकरण देताना विराट कोहलीने हा एक आव्हानात्मक निर्णय होता, असे म्हटले. तथापि, राहुल चहरची संघात का निवड केली याचे देखील कारण कोहलीने सांगितले. राहुल चहरची निवड संघात केली कारण त्याने मागील काही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तसेच, तो वेगाने गोलंदाजी करतो. याचा फायदा युएईच्या खेळपट्ट्यांवर होईल. तसेच, पुढे बोलताना चहरच्या कामगिरीवर बरीच चर्चा केल्याचे टी-२० विश्वचषकापूर्वी आयसीसीच्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

स्पर्धेत खेळपट्टी अधिक संथ होत जाणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे अशा स्थितीत, वेगवान गोलंदाजी करणारे फिरकीपटू फलंदाजांना अधिक त्रास देतील. राहुल हा असा गोलंदाज आहे जो विकेट घेण्याच्या कलेत पारंगत आहे. चहलला बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण असला तरी वर्ल्ड कप संघात संख्या मर्यादित आहे आणि प्रत्येकाला जागा मिळू शकत नाही, असे विराट कोहली म्हणाला. युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये १५ सामन्यांत १८ विकेट्स घेतले आहेत. तर राहुल चाहरने मुंबई इंडियन्ससाठी ११ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, विराट कोहलीने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा बचाव केला. भुवनेश्वरला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. अनुभव दबाव परिस्थितीत उपयोगी येतो. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलच्या आमच्या शेवटच्या सामन्यात, आम्ही पाहिले की त्याने एबी डिव्हिलियर्सविरुद्ध चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -