घरक्रीडाODI Rankings : विराट कोहली दुसऱ्या स्थानी; श्रीलंकेच्या कर्णधाराला बढती

ODI Rankings : विराट कोहली दुसऱ्या स्थानी; श्रीलंकेच्या कर्णधाराला बढती

Subscribe

कुसाल परेराला १३ स्थानांची बढती मिळाली असून तो ४२ व्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान राखले आहे. बुधवारी जाहीर झालेला ताज्या क्रमवारीनुसार, श्रीलंकेचा नवा एकदिवसीय कर्णधार कुसाल परेरा आणि वेगवान गोलंदाज दुष्मन्थ चमीरा यांना अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत बढती मिळाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनाही फलंदाजांच्या यादीत आपले स्थान कायम राखण्यात यश आले आहे. कोहली ८५७ गुणांसह दुसऱ्या, तर रोहित ८२५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी कायम असून त्याचे ६९० गुण आहेत.

कुसाल परेरा ४२ व्या स्थानावर

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नुकतीच एकदिवसीय मालिका पार पडला. या मालिकेदरम्यान श्रीलंकेचा कर्णधार कुसाल परेराने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले सहावे शतक झळकावले होते. त्यामुळे त्याला १३ स्थानांची बढती मिळाली असून तो ४२ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच धनंजय डी सिल्वालाही बढती मिळाली असून त्याने ८५ वे स्थान मिळवले आहे.

- Advertisement -

चमीराला २७ स्थानांची बढती

गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या चमीराला तब्बल २७ स्थानांची बढती मिळाली असून तो कारकिर्दीतील सर्वोत्तम ३३ व्या स्थानी पोहोचला आहे. तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी ७२ व्या स्थानावर होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात तीन विकेट घेतल्याने मागील आठवड्यात तो काही स्थाने पुढे सरकला होता. तर अखेरच्या सामन्यात पाच विकेट घेतल्यामुळे त्याला आता तब्बल २७ स्थानांची बढती मिळाली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -