घरक्रीडाICC World T20 चे नामकरण आता T20 World Cup

ICC World T20 चे नामकरण आता T20 World Cup

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने T20 स्पर्धेला ट्वेंटी२० विश्वचषक असे नामांकन केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने शुक्रवारी विश्व T20 स्पर्धेला ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ असे नामांतर केले. या कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आणि याचा दर्जा वन-डे तसेच कसोटी सामन्यांच्या बरोबर यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसी बोर्डाने मंजुरी दिली आहे की, त्याच्या सदस्यांमधील सर्व टी-२० सामन्यांना टी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी क्षेत्रीय पात्रता प्रक्रिया सुरू केली असून जी १०४ राष्ट्रांतील सर्व खेळाडूंना खेळायला आणि विश्वचषक जिंकण्यासाठी संधी प्रदान केली आहे.

आयसीसी वर्ल्ड कप टी-२०चे नामांतर करण्याच्या निर्णयाला बऱ्याच आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारांनी समर्थन दिले आहे. तर दरम्यानच्या काळात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डुप्लेसि याने इशारा दिला की, हा कार्यक्रम त्याचा अंतिम आयसीसी कार्यक्रम असणार आहे. अर्थात त्याने निवृत्तीचा इशारा वर्तवला आहे.

- Advertisement -

“वैयक्तिकरित्या माझ्यासाठी २०२० मध्ये होणारा आयसीसी टी -२० विश्वचषक आणि कदाचित २०१९ मधील वनडे विश्वचषकानंतर माझी शेवटची आयसीसी स्पर्धा असेल. त्यामुळे २०१९ मध्ये न जिंकल्यास, विश्वचषक मिळविण्याची मला एक शेवटची संधी २०२० मध्ये मिळेल,” असे डुप्लेसिने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दोन्ही विश्वचषकांचे यजमानपद सांभाळत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया २०२० मध्ये आयसीसी महिला टी -20 विश्वचषक आणि पुरुष टी -20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे ही खूप रोमांचक गोष्ट आहे.” विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक मोठा सन्मान आहे. २०१५ मध्ये आपल्याच भूमीवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकणे ही एक अविश्वसनीय भावना होती. आता आम्हाला ऑस्ट्रेलियात जगातील सर्वोत्तम टी -20 संघांबरोबर खेळायची संधी मिळते आहे. टूर्नामेंटसाठी अद्याप बरीच तयारी बाकी आहे, परंतु आम्ही आव्हानाला सामोरे जायला आणि ऑस्ट्रेलियातील आमच्या चाहत्यांच्या समोर खेळायला उत्सुक आहोत,” असेही फिंच म्हणाला.

- Advertisement -

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “ही एक रोमांचक स्पर्धा आहे जी सर्व संघांना खेळायला मिळत आहे. यामुळे बऱ्याच वर्षांपासून जगभरातील सर्वोत्तम गोष्टी एकत्रित केल्या आहेत आणि म्हणून मला वाटते की नावामध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रगती आहे.” “मला खात्री आहे की या टूर्नामेंटची लोकप्रियता नक्की वाढेल”, असे हरमनप्रीत यांनी सांगितले.

भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, “ऑस्ट्रेलियात टी -20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. टी -20 क्रिकेटसाठी आता महत्तवाची स्पर्धा ही विश्वचषक आहे. २००७ मध्ये भारताने टी -20 विश्वकरंडकाची पहिली आवृत्ती जिंकली होती आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये टी -20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठी हा एक चांगला क्षण आहे.”

२०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणारे आगामी इव्हेंट्स आता आयसीसी महिला टी -20 विश्वचषक २०२० आणि आयसीसी पुरुष टी -20 विश्वचषक २०२० म्हणून ओळखले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -