घरक्रीडाकोहली पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटर - शेन वॉर्न

कोहली पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटर – शेन वॉर्न

Subscribe

विराट कोहली हा पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटर आणि त्याच्यामुळे मेलबर्नवरील सामना अप्रतिम होईल असेही शेन वॉर्न म्हणाला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. भारताने पहिला सामना जिंकला आणि दुसरा सामना गमावला. त्यामुळे तिसरा कसोटी सामना रंजकदार होणार आहे हे निश्चित. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नच्या मते या सामन्यात पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटर विराट कोहली खेळणार असल्याने हा सामना अधिकच अप्रतिम होईल.

गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियामध्ये झालेली सर्वोत्तम मालिका

या मालिकेविषयी आणि विराट कोहलीविषयी वॉर्न म्हणाला, “मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळायला मिळावे हे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. फार कमी लोकांना ही संधी मिळते. या ग्राउंडवर प्रेक्षक जो आवाज करतात, इथे होणाऱ्या सामन्यांमध्ये जे वातावरण असते तसे फार कमी कमी मैदानांवर अनुभवायला मिळते. या सामन्यासाठी चाहते उत्सुक असणार यात शंका नाही. माझ्यामते गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियामध्ये झालेली सर्वोत्तम मालिका आहे. ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे हा सामना खूप अप्रतिम होईल असा मला विश्वास आहे. त्यातच या सामन्यात पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटर विराट कोहली खेळणार असल्याने हा सामना अधिकच मनोरंजक होणार आहे. मागील सामन्यात विराट आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यात जे झाले ते मला आवडले. त्यातून या दोघांचीही सामना जिंकण्याची जिद्द दिसून आली.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -