घरक्रीडाIND vs ENG : शुभमन गिल इंग्लंड मालिकेला मुकणार? ‘या’ सलामीवीराला संधी मिळण्याची शक्यता

IND vs ENG : शुभमन गिल इंग्लंड मालिकेला मुकणार? ‘या’ सलामीवीराला संधी मिळण्याची शक्यता

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे सुरुवात होणार आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राखीव खेळाडूंमधील बंगालच्या अभिमन्यू ईश्वरन या सलामीवीराची मुख्य संघात निवड होऊ शकेल. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये गिलच्या जागी मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे सुरुवात होणार आहे.

संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता

कसोटी मालिकेला अजून एक महिन्याहूनही अधिकचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, असे असले तरी शुभमन गिल या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याचे आम्हाला समजले आहे, असे बीसीसीआयच्या सिनियर अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, गिलला काय दुखापत झाली आहे, ही दुखापत कधी आणि कशी झाली हे स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

मयांकला संधी मिळण्याची शक्यता

गिलला नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फारशा धावा करता आल्या नाहीत. पहिल्या डावात तो २८ धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात केवळ ८ धावा करू शकला. त्यामुळे त्याच्या जागी मयांक अगरवालला संधी देण्याविषयी चर्चा सुरु होती. आता गिल जायबंदी झाल्याने पहिल्या कसोटीसाठी मयांकची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्याची दाट शक्यता आहे. मयांकने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांत १०५२ धावा केल्या असून यात तीन शतकांचा समावेश आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -