घरक्रीडाइंग्लंड दौऱ्यात कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी; भारतीय क्रिकेटपटूंसाठी तब्बल १८ दिवसांचा क्वारंटाईन...

इंग्लंड दौऱ्यात कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी; भारतीय क्रिकेटपटूंसाठी तब्बल १८ दिवसांचा क्वारंटाईन पिरेड

Subscribe

इंग्लंडमध्ये १० दिवस क्वारंटाईन असताना भारतीय खेळाडूंना सराव करण्याची परवानगी आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ २५ मेपासून तयारीला लागणार आहे. सुरुवातीला भारतात तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये हे खेळाडू राहणार असून त्यानंतर ते इंग्लंडसाठी रवाना होतील. भारतात आणि इंग्लंडमध्ये मिळून खेळाडूंना एकूण १८ क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असून या काळात त्यांना सराव करण्याची परवानगी आहे. तसेच खेळाडू आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन जाऊ शकणार आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाच्या या इंग्लंड दौऱ्याची पूर्ण योजना आखली आहे. परंतु, खेळाडूंच्या लसीकरणाबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

बबलमधून बाहेर पडण्याची परवानगी नाही

भारतात बायो-बबल तयार करण्यात येणार आहे. भारतीय खेळाडू २५ मे रोजी या बबलमध्ये दाखल होणार असून पुढील आठ दिवस इथेच क्वारंटाईन होतील. त्यांची सातत्याने कोरोना चाचणी होईल. तसेच त्यांना बायो-बबलमधून बाहेर पडण्याची परवानगी नसेल. त्यानंतर ते इंग्लंडला रवाना होतील. इंग्लंडमध्येही त्यांना १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. परंतु, भारतात क्वारंटाईन राहिल्याने आणि त्यानंतर चार्टर विमानाने प्रवास करणार असल्याने खेळाडूंना इंग्लंडमध्ये क्वारंटाईन असताना सराव करण्याची परवानगी असेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

अंतिम सामना १८ जूनपासून

इंग्लंडमध्ये १० दिवस क्वारंटाईन असताना भारतीय खेळाडूंना सराव करण्याची परवानगी आहे. तसेच भारताचे खेळाडू तीन महिन्यांहूनही जास्त काळ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने त्यांच्या कुटुंबियांना सोबत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून खेळला जाईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -