घरक्रीडाIND vs ENG : गिलसाठी बदली खेळाडू नाहीच; बीसीसीआयची टीम इंडियाला माहिती

IND vs ENG : गिलसाठी बदली खेळाडू नाहीच; बीसीसीआयची टीम इंडियाला माहिती

Subscribe

भारताकडे सध्या सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय आहे.

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची जागा घेण्यासाठी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या दोन सलामीवीरांना इंग्लंडमध्ये पाठवण्याची भारतीय संघ व्यवस्थापनाकडून विनंती करण्यात आली होती. परंतु, निवड समितीकडून त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. आता गिलसाठी बदली खेळाडू इंग्लंडला पाठवण्यात येणार नाही, असे बीसीसीआयने भारतीय संघ व्यवस्थापनाला कळवल्याची माहिती आहे.

पडिक्कलला योग्य वेळी संधी दिली जाईल

इंग्लंड दौऱ्यासाठी २४ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यावेळी पृथ्वी शॉचा विचार झाला नव्हता, मग आता त्याला इंग्लंडमध्ये पाठवण्याची काय गरज आहे? तसेच देवदत्त पडिक्कल हा प्रतिभावान खेळाडू आहे, पण त्याच्यावर दबाव टाकण्याची आवश्यकता नाही. त्याला योग्य वेळी संधी दिली जाईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

ई-मेलकडे दुर्लक्ष

भारताकडे सध्या सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय आहे. परंतु, राहुलला मधल्या फळीत खेळवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन विचार करत आहे. तसेच राखीव फळीतील अभिमन्यू ईश्वरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याची त्यांना खात्री नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गिलची जागा घेण्यासाठी शॉ आणि पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्याची विनंती करणारा ई-मेल निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना पाठवला होता. परंतु, शर्मा यांनी या ई-मेलकडे दुर्लक्ष केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -