घरक्रीडाभारताला मालिकेत बरोबरी करण्याची सुवर्णसंधी

भारताला मालिकेत बरोबरी करण्याची सुवर्णसंधी

Subscribe

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत अप्रतिम विजय मिळवत आपले मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. आता या मालिकेचा चौथा सामना गुरूवारपासून सुरु होणार आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जिंकण्याची शक्यता असताना तो सामना गमावला. तर दुसऱ्या कसोटीत तर भारताने अत्यंत खराब प्रदर्शन केले. हा सामना भारताने एक डाव आणि १५९ धावांनी गमावला. पण तिसऱ्या कसोटीत भारताने पुनरागमन केले. त्यांनी हा सामना २०३ धावांनी जिंकली. तरीही इंग्लंडकडे या मालिकेत २-१ अशी आघाडी आहे. त्यामुळे जर भारताला ही मालिका जिंकायची असेल तर साऊथहँप्टन येथे होणारा सामना जिंकणे भारताला अनिवार्य आहे.

तिसऱ्या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी केले पुनरागमन 

भारताच्या फलंदाजांनी या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक प्रदर्शन केले होते. पण ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी या मालिकेत पहिल्यांदाच ५० हून अधिक धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ७२ धावांची खेळी केली. तसेच अजिंक्य रहाणेनेही पहिल्या डावात कठीण परिस्तिथीत ८१ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार विराट कोहलीने आपले दमदार प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. त्याने या तिसऱ्या सामन्यात ९७ आणि १०३ अशा एकूण २०० धावा केल्या. तर अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही दुसऱ्या डावात आक्रमक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे भारताचे फलंदाज फॉर्मात आले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

तर गोलंदाजही मागे नाहीत 

गोलंदाजांनी या मालिकेत चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी या मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचे २० विकेट्स घेतल्या होत्या. तर तिसऱ्या सामन्यातही भारताच्या विजयात भारतीय गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या कसोटीत दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या. तर याच सामन्याच्या पहिल्या डावात हार्दिक पांड्याने ५ विकेट घेतल्या होत्या. या दोघांना इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि अश्विन यांनी चांगली साथ दिली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीतही गोलंदाजांकडून खूप अपेक्षा आहेत.

इंग्लंडच्या संघात दोन बदलांची शक्यता  

मालिकेचा तिसरा सामना गमावणाऱ्या इंग्लंडच्या संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. फलंदाज ऑली पोप आणि क्रिस वोक्स यांच्याजागी मोईन अली आणि सॅम करन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -