घरक्रीडाIndia Tour of Ireland 2022: टीम इंडिया करणार आयर्लंडचा दौरा, स्टार खेळाडू...

India Tour of Ireland 2022: टीम इंडिया करणार आयर्लंडचा दौरा, स्टार खेळाडू राहणार मालिकेतून बाहेर

Subscribe

भारताची द्वितीय श्रेणीतील टीम यंदा २६ आणि २८ जूनला आयरलँडविरुद्ध मलाहाइडमध्ये दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. क्रिकेट आयरलँडकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय क्रिकेट टीम दोन सामन्यांच्या मालिकेसाठी आयरलँडचा दौरा करेल. भारताने शेवटच्या वेळी २०१८ मध्ये आयरलँडचा दौरा केला होता तेव्हा भारताने टी-२० मालिका २-० ने जिंकली होती.

भारतविरुद्ध आयरलँड मालिका दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, विकेटकीपर ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची खेळण्याची शक्यता आहे. भारताला १ ते ५ जुलैमध्ये इग्लंडविरुद्ध मागील मालिकेतील कसोटी सामना खेळायचा आहे. क्रिकेट आयरलँडकडून ट्विट करण्यात आले आहे की, स्टार खेळाडूंचे सत्र असेल कारण भारत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना भारताचा दौरा करायचा आहे. तर आम्हाला ब्रिस्टलमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत खेळणार आहे. आम्ही आयरलँडच्या सर्वात मोठ्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तयार आहोत.

- Advertisement -

भारत दोन टी-२० सामने खेळून आयरलँडच्या क्रिकेट सत्राला सुरुवात करेल. यानंतर भारतीय टीम इंग्लंडसोबत जुलैमध्ये कसोटी कसोटी सामना खेळणार आहे. तर या दोन्ही टीममध्ये ७ जुलैपासून ३ टी-२० आणि कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

आयरलँड दौऱ्यात नव्या युवा खेळाडूंना मिळणार संधी

आयपीएल २०२२नंतर आयरलँड दौऱ्यापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका भारतात होणार असून ९ जून पासून १५ जूनपर्यंत मालिका असेल. आयरलँडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांचा सामना खेळायचा आहे. यामुळे व्यस्त शेड्यूलमध्ये आयरलँड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : IPL मध्ये सुरेश रैनाची होणार एन्ट्री, गुजरात टायटन्समध्ये मिळू शकते संधी, काय आहे व्हायरल सत्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -