घरक्रीडापहिला सामना करोनाशी

पहिला सामना करोनाशी

Subscribe

एकदिवसीय सामन्याआधी सतर्कता,भारत वि.साऊथ आफ्रिका

न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावरील नवीन आव्हानासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. धर्मशाळा येथे पहिला सामना खेळवला जाणार आहे. परंतु,या सामन्यावर सध्या देशात भितीचे वातावरण पसरवलेल्या करोनाचे सावट आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत. गर्दीची ठिकाणे टाळण्यापासून ते थेट सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांपासून अंतर राखा अशा सूचना दिल्या जात आहेत.करोनाची लागण होऊ नये याकरता सर्व परदेशी नागरिकांनाही योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान धर्मशाळा येथील मैदानावरही करोना पासून वाचण्यासाठी काय करावे यासाठीचे मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

चेंडूला थुंकी लावणार नाही                                                                                                      भारतीय क्रिकेट संघानेही करोनाचा धसका घेतला असून, गोलंदाजांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चेंडूला चमक आणण्यासाठी गोलंदाज बहुतांशवेळा आपल्या थुंकीचा वापर करतात. मात्र यंदा करोनाच्या भीतीमुळे भारतीय गोलंदाज ही कृती करणे शक्य तो टाळणार आहेत. संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ही माहिती दिली. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही सामना संपल्यानंतर हस्तांदोलन न करण्याची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

स्टेडियममध्ये १० डॉक्टरांची टीम                                                                                          विमानतळावरून येणार्‍या प्रत्येकाची तपासणी नीट सुरू आहे की नाही यावर मुख्य वैद्यकीय अधिकारी स्वत: लक्ष ठेऊन आहेत. याशिवाय, स्टेडियममध्ये प्रवेशद्वाराजवळ १० डॉक्टरांची टीम असणार आहे. लेझर थर्मामीटरच्या माध्यमातून प्रत्येकी चाचणी केली जाईल. ज्यांना ताप आला असेल, त्यांची लगेच तपासणी केली जाईल. याशिवाय सर्वत्र मास्क देण्यात येणार आहेत आणि रूग्णवाहिकादेखील स्टेडियमबाहेर तैनात असणार आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला करोना विषाणुचे रुग्ण भारतातही आढळल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणांकडून काळजी घेण्यास सुरुवात झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दिल्ली विमानतळावरुन धर्मशाळा येथे जाताना तोंडावर मास्क लावलेला फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

भारतीय संघ-                                                                                                              शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -