घरक्रीडाIndia vs England Test : इंग्लंडच्या पहिल्या दिवशी ९ बाद २८५ धावा

India vs England Test : इंग्लंडच्या पहिल्या दिवशी ९ बाद २८५ धावा

Subscribe

भारतविरूद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात आश्विनच्या फिरकीने केली इंग्लंडची दांडी गुल, २५ ओव्हरमध्ये ६० धावा देत घेतल्या ४ विकेट्स.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या अप्रतिम बॉलिंगसमोर इंग्लंडचे बॅट्समन दिवसअखेर केवळ २८५ धावा करू शकले. इंग्लंडला ९ विकेट्स देखील गमवाव्या लागल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने ८० तर बेअरस्टोने ७० धावा करत अर्धशतक झळकावले. दिवस संपताना जेम्स अँडरसन ९ चेंडूत ० धावांवर तर सॅम कुर्रान ६७ चेंडूत २४ धावांवर खेळत होते. भारताकडून आश्विनने ४, मोहम्मद शमीने २ तर इशांत आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


सर्वात आधी अश्विनने इंग्लंडचा प्रमुख बॅट्समन अ‍ॅलेस्टर कुक याला बाद करत सामन्यात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्या वेळी इंग्लंडच्या संघाची परिस्थिती २६ वर १ बाद अशी होती. त्यानंतर जेनिंग्ज आणि कर्णधार जो रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीने जेनिंग्जला बाद करत पार्टनरशीप तोडली. त्यानंतर इंग्लंडचा एक-एक बॅट्समन बाद होत गेला आणि इंग्लंडची ११२ वर ३ बाद अशी अवस्था झाली. त्यानंतर जो रुट आणि बेअरस्टोच्या पार्टनरशिपने अप्रतिम खेळी खेळली. रुटने ८० तर बेअरस्टोने ७० धावा केल्या. त्यानंतर अखेरचे बॅट्समन सॅम क्युरान आणि आदिल राशिद यानी अर्धशतकी पार्टनरशिप रचली मात्र राशिदला ईंशातने बाद करत ही पार्टनरशिप तोडली आणि दिवसअखेर इंग्लंडच्या २८५ धावा झाल्या. त्यावेळी जेम्स अँडरसन ९ चेंडूत ० धावांवर तर सॅम कुर्रान ६७ चेंडूत २४ धावांवर खेळत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -