BCCIकडून भारतीय संघाच्या मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनपर्यंतच्या प्रवासाला कोटींचा खर्च

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मलिकेसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. नुकताच भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका खिशात घातली. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मलिकेसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. नुकताच भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका खिशात घातली. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यासाठी मँचेस्टरहून भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेनसाठी फ्लाईट घेतली होती. मात्र हा प्रवास भारतीय संघाने एका चार्डर्ड फ्लाईटने केला असून, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तब्बल ३.५ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे.

भारतीय संघाचा चार्डर्ड फ्लाईटने प्रवास

वेस्ट इंडिय दौऱ्याला जाण्यासाठी भारतीने चार्डर्ड फ्लाईटने प्रवास केला. मँचेस्टर (इंग्लंड) ते पोर्ट ऑफ स्पेन (वेस्ट इंडिज) असा जवळपास १० तास प्रवास भारतीय संघाने केला. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या १० तासांच्या प्रवासासाठी भारतीय खेळाडूंसाठी एक चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. या फ्लाईटमध्ये खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि मैत्रिणींनीदेखील प्रवास केला.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड

बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. आपल्या खेळाडूंच्या सुविधांची काळजी घेण्यात मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. इंग्लंडमध्ये नुकतीच झालेली मालिका संपल्यानंतर, संघाला मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनसाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली होती.

भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दिपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार) शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.


हेही वाचा – जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा अनु राणीची धडक