घरक्रीडाIND vs AUS : रोहित, बुमराहच्या अनुपस्थितीत जिंकणे कौतुकास्पद!

IND vs AUS : रोहित, बुमराहच्या अनुपस्थितीत जिंकणे कौतुकास्पद!

Subscribe

व्ही. व्ही. एस लक्ष्मणने भारतीय संघाची स्तुती केली. 

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निराशाजनक सुरुवात केली होती. त्यांनी एकदिवसीय मालिका १-२ अशी गमावली. त्यानंतर मात्र विराट कोहलीच्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात केली. भारताचा प्रमुख सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळला नाही. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टी-२० मालिकेच्या तिन्ही सामन्यांत विश्रांती देण्यात आली. बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो, तर रोहितची सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकणे हे कौतुकास्पद असल्याचे भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण म्हणाला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. या मालिका विजयाची खास गोष्ट म्हणजे भारतीय संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नव्हता. सर्वच फलंदाजांनी वेळोवेळी योगदान दिले. पुढील दोन वर्षांत दोन टी-२० विश्वचषक होणार असल्याने ही भारतीय संघासाठी आनंदाची गोष्ट आहे. रोहित शर्मा संघात परतल्यावर भारताची ताकद आणखी वाढेल. रोहित आणि बुमराह संघात नसताना भारताने ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत नमवले हे कौतुकास्पद आहे. मात्र, भारताने क्षेत्ररक्षणावर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी बरेच झेल सोडले. परंतु, आगामी सामन्यांत हा संघ चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसेल याची मला खात्री आहे, असे लक्ष्मणने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -