काँग्रेसमुक्त भारत बनविणारेचं मुक्त होतील, पण.. अशोक गहलोत यांचे भाजपवर टीकास्त्र

those who make congress free india will be free but ashok gehlot targets bjp

काँग्रेसमुक्त भारत बनविणार बोलणारे मुक्त होतील, पण काँग्रेस देशात कायम राहील. अशा शब्दात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवरं टीकास्त्र डागले आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गहलोत बोलत होते.

यावेळी गहलोत म्हणाले की, देशातील प्रत्येक गावात काँग्रेस आहे. धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली. आता हिंदू धर्माच्या नावावर देश बनविण्याचे काम सुरु आहे. पाकिस्तानचे तुकडे झाल्याचे आपल्या समोर आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शुक्रवारी शेतकरी संघाच्या प्रांगणात प्रेरणा दीन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी नेते उपस्थित होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

यावेळी समाजसेवा, पर्यावरण, सहकार, साहित्य, माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांना देण्यात आला, तर कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा यंदाचा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे यांना देण्यात आला, तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजीमंत्री तथा विलासनगर (लातूर) येथील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे.


भगवा झेंडा हाच आपला उमेदवार; न्यायालयाच्या सुनावणीवेळी उद्धव ठाकरेंचा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद