Eco friendly bappa Competition
घर क्रीडा नागपुरात आज होणाऱ्या भारत-ऑस्टेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

नागपुरात आज होणाऱ्या भारत-ऑस्टेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

Subscribe

नागपूर – मोहालीतील लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मंगळवारी भारताचा पराभव झाला होता. दरम्यान आज भारतीय संघ दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाशी सामना खेळणार आहे. नागपुरात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. याबाबत अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपूर्वीची रंगीत तालीम म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेकडे पाहिले जात आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावर नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या लढतीत भारताने बांगलादेशचा २९ धावांनी पराभव केला होता.

  • पावसाने उसंत दिली तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. जामठा स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या १२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांपैकी नऊमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे.
  • व्हीसीएचे हे मैदान जलदगती गोलंदाज दीपक चहरसाठी चांगलेच लाभदायी राहिले आहे. या मैदानावर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देत ६ गडी बाद केले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीमध्ये दीपकची कामगिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • टी-२० सामन्यात प्रेक्षकांना धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र, जामठा स्टेडियमवर आतापर्यंत केवळ एकदाच २०० धावांचा पल्ला गाठता आला आहे. उर्वरित सर्व लढती या कमी धावसंख्येच्या ठरल्या आहेत.
- Advertisement -

पावसाचे अंदाज –

नागपुरात तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, शुक्रवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दोन्ही संघांनी सराव केला नाही. पावसामुळे मैदान खराब होऊ नये यासाठी मैदानभर कव्हर टाकण्यात आले आहे. पावसाने उसंत घेतली तर विनाअडथळा सामना खेळवला जावा, याची संपूर्ण तयारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने केली आहे. दरम्यान, शुक्रवारी पावसाचा अंदाज असला तरी सायंकाळी तशी शक्यता फार कमी आहे. पाऊस आला तरी तो थोड्या वेळासाठी असेल, असे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -