घरक्रीडाIND vs SA 2nd Test: पुजारा, रहाणे फ्लॉप ! २०२ धावात...

IND vs SA 2nd Test: पुजारा, रहाणे फ्लॉप ! २०२ धावात भारताचा डाव गडगडला

Subscribe

जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २०२ धावांवर तंबूत परतला. या सामन्यात भारतासाठी कर्णधारपद म्हणून कामगिरी करणाऱ्या केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. तर राहुलनंतरचा सर्वाधिक स्कोर केला तो म्हणजे रविचंद्रन अश्विनने ४६ धावा करून. त्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना युवा गोलंदाज मार्को जेनसेनने ४ विकेट्स घेतल्या. तर कगीसो रबाडाने ३ खेळाडूंना बाद केले.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामीचे फलंदाज म्हणून केएल राहुलसोबत मयंक अग्रवाल सलामीवीर म्हणून आले. मयंकने ३७ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. पण ही खेळी त्याला मोठ्या धावसंख्येत बदलता आली नाही. मयांक बाद झाल्यानंतर राहुलने खूपच चिकाटी दाखवली. राहुलने १३३ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले. राहुलने ९ चौकाऱांच्या मदतीने ५० धावा केल्या. पण राहुलचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

- Advertisement -

रवीचंद्रन अश्विनने काही वेळ सामन्यात चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला खरा. पण सामन्यात ५० चेंडूत ६ चौक्याच्या मदतीने ४६ धावांची खेळी अश्विनने केली. त्याआधी हनुमा विहारीने ५३ चेंडूत २० धावा केल्या. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतने १७ धावा केल्या. त्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता. तर जसप्रीत बुमराह १४ धावा करून नाबाद राहिला. बुमराहने ११ चेंडूंचा सामना करत २ चौकारही लगावले.

रहाणे, पुजारा पुन्हा फ्लॉप

भारतीय संघांकडून वारंवार संधी मिळणारे अनुभवी फलंदाज असलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या सामन्यातही चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. रहाणे पहिल्याच चेंडूवर एकही धावा न करता तंबूत स्वस्तात परतला. तर पुजाराने ३३ चेंडूंचा सामना करत ३ धावा केल्या. शार्दुल ठाकुर शून्यावर बाद झाला. मोहम्मद शमीने ९ धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने १ धाव केली.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेने सावध सुरूवात करत


IND vs SA 2nd Test: वॉन्डरर्समध्ये पाच भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला धुरळा, टॉपवर रनमशीन कोहली

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -