घरक्रीडाकांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झालेल्या महिला संघाला शाहरुखने 'चक दे इंडिया' स्टाईलने...

कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झालेल्या महिला संघाला शाहरुखने ‘चक दे इंडिया’ स्टाईलने दिला धीर

Subscribe

गेल्या अनेक दिवसापासून अभिनेता शाहरूख खानची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी संघावर संपुर्ण भारतीयांच्या नजरा वळाल्या होत्या. पण महिला संघ कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झाला आहे. इंग्लंडने भारताला ४-३ असे हरवलं आहे. या पराभवानंतर महिलांना रडू अनावर झाले आणि त्या मैदानामध्येच रडू लागल्या. पण अपयशानंतरही हॉकी प्रेमींनी संघाचा विश्वास वाढवण्यासाठी काही हरकत नाहीये आपण 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करु असे म्हणत अनेक स्तरातून त्यांचा धीर वाढवण्याचा तसेच दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता शाहरूख खानचा देखील समावेश आहे. ‘चक दे इंडिया’ या सिनेमात हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या शाहरूख खानने भारतीय हॉकी महिला संघाला पाठिंबा देत ट्विट करत त्यांचा अत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर बॉलिवूड किंग खान शाहरूखने आपल्या खास अंदाजात लिहले की, “हे दु:खद आहे. मात्र तरीही आपण आपली मान गर्वाने उंचवू शकतो. भारतीय महिला हॉकी संघाने उत्तम कामगिरी केली. तुम्ही भारतातील प्रत्येकाला प्रेरणा दिली आहे. तुम्ही दिलेली ही प्रेरणा म्हणजेच विजय आहे,”

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसापासून अभिनेता शाहरूख खानची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 2 ऑगस्ट रोजी भारतीय संघाने हॉकी संघाला 1-0 च्या फरकाने हरवून उपांत्याफेरीत धडत मारली होती आणि यानंतर शाहरुख खानने ‘चक दे इंडिया’ या सिनेमात ज्या प्रमाणे महिला संघाला पदक जिंकून दिलं होतं आता तसचं भारतीय महिला हॉकी संघ करणार असल्याचं सोशल मीडियावर बोलण्यात येत होतं. अनेक भारतीय नागरिकांसह शाहरुखला सुद्धा महिला संघाने भारताला टोकियो ऑलिम्पिंकमध्ये सुवर्ण पदक जिंकाव अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता कांस्यपदकाच्या सामन्यात अपयश मिळाल्यानंतर शाहरुखने भारतीय महिलांन दिलासा दिला आहे.


हे हि वाचा – खेलरत्न पुरस्कार आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -