घरक्रीडाभारताचा नव्या दिशेने जाण्याचा निर्णय - दानिश कनेरिया

भारताचा नव्या दिशेने जाण्याचा निर्णय – दानिश कनेरिया

Subscribe

भारत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत भारत २-०ने आघाडीवर आहे. भारताबद्दल आता पाकिस्तानचा पूर्व खेळाडू दानिश कनेरियाने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर त्याने आपले म्हणणे मांडले. दानिश कनेरियाच्या मते पाकिस्तानपेक्षा भारताकडे अधिक स्पष्टता आहे आणि त्यामुळेच आपला संघ चांगली कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये खेळाडूंना ड्रॉप होण्याची भीती आहे आणि त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

दानिश कनेरिया म्हणाला की, पाकिस्तान काही खेळाडूंना प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळवत आहे, परंतु व्यवस्थापनाला कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांच्या मते, भारताने आधीच हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) तयार करण्यास सुरुवात केली आहे, तर पाकिस्तान संघात बाबर आझम (Babar Azam) तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करतोय .

- Advertisement -

भारताचा नव्या दिशेने जाण्याचा निर्णय – दानिश कनेरिया (India’s decision to move in a new direction – Danish Kaneria)

दानिश कनेरिया म्हणाला की, हार्दिक पांड्या आता टी-20 संघाचे नेतृत्व करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.(“India have made it clear that Hardik Pandya will look after the T20I team as they move in a new direction without Rohit and Kohli.) त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय नव्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, येथे आम्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये फक्त बाबर आझममध्ये अडकलो आहोत. याचे कारण खेळाडूंना डावलण्याची भीती आहे. जेव्हा संघात सुरक्षित वाटत नाही, तेव्हा त्याचा परिणाम संघावर जाणवतो. जर तुम्हाला आव्हानात्मक संघ बनायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे तो म्हणाला.

- Advertisement -

पाकिस्तान गेल्या काही काळापासून चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरतेय. पाकिस्तनाला स्वतःच्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड वनडे, टी-20, टेस्ट सीरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यानंतर बाबर आझम आणि पाकिस्तान संघाला टीकेला सामोरं जावं लागतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -