घरक्रीडाइंडोनेशिया ओपन टेनिस स्पर्धा

इंडोनेशिया ओपन टेनिस स्पर्धा

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरी पार करण्यासाठी सिंधूला झुंज द्यावी लागली होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत तिने आपला सर्वोत्तम खेळ करत जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-१४, २१-७ असे सहजपणे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाचव्या सीडेड सिंधूने हा सामना केवळ ४४ मिनिटांमध्ये जिंकला.

या सामन्याची तिने दमदार सुरुवात करत पहिल्या गेममध्ये ३-० अशी आघाडी मिळवली. मात्र, ओकुहाराने चांगले पुनरागमन करत ५-५ अशी बरोबरी केली. परंतु सिंधूने आपला खेळ पुन्हा एकदा उंचावत पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरानंतरही सिंधूने आपला दमदार खेळ सुरु ठेवत १९-१२ अशी मोठी आघाडी मिळवली, तर तिने पुढील ४ पैकी २ गुण मिळवत पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसर्‍या गेमची दोन्ही खेळाडूंनी चांगली सुरुवात केल्यामुळे सिंधूकडे ६-४ अशी केवळ २ गुणांची आघाडी होती.

- Advertisement -

मात्र, तिने अधिक आक्रमक खेळ करत मध्यंतराला ११-६ अशी आघाडी मिळवली. यानंतर सिंधूने उत्कृष्ट खेळ करत ओकुहाराला केवळ १ गुण मिळवू दिला. सिंधूने ११ पैकी १० गुण मिळवत हा गेम आणि सामना जिंकला. आता सिंधूचा उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईशी सामना होईल. युफेईने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या बिवेन झॅन्गचा २१-१४, १७-२१, २१-१६ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -