घरमुंबईतुंगारेश्वर जंगलात महिलेच्या हत्येचा प्रयत्न

तुंगारेश्वर जंगलात महिलेच्या हत्येचा प्रयत्न

Subscribe

‘पती पत्नी आणि प्रेयसी’ प्रकरण

प्रेमिका आपल्या संसारात अडसर ठरू लागल्याने पतीने पत्नी आणि प्रेमिकेलाही सोबत घेऊन पत्नीच्या मदतीने प्रेमिकेच्या हत्येचा कट केला. पत्नीच्या मदतीने पारोळ येथील तुंगारेश्वर जंगलात प्रेमिकेवर हल्ला केला. त्यात प्रेमिकेचा मृत्यू झाल्याचे समजून पती पत्नीने जंगलात तिला सोडून पळ काढला. मात्र बेशुद्ध पडलेली प्रेमिका काही काळाने शुद्धीवर आल्यावर ती जंगलातून उतरत असताना त्याच मार्गाने येत असलेल्या सदानंद महाराज यांच्या भक्तांनी तिला आपल्या रिक्षात घालून तिला जंगलातून खाली आणत तिचे प्राण वाचवले. विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.

नायगांव पूर्वेकडील परेरा नगरातील मनोहर शुक्ला याचे मागील काही वर्षांपासून बापाणे-महेंद्र चाळीतील नयना महंत बरोबर प्रेमसंबंध होते. या संबंधात सर्व काही आलबेल असताना मागील काही महिन्यांपासून त्यांचे प्रेम संबंध पत्नी समोर उघड झाल्याने नयना त्यांच्या संसारात अडचण ठरू लागली होती. यामुळे पत्नी प्रमिला व मनोहरमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे नयनाचा काटा काढण्याचे पती व पत्नीने ठरवून बुधवारी तिला देव दर्शन करायचे आहे.

- Advertisement -

असे सांगून मनोहर व त्याच्या पत्नीने स्कुटीवर बसवून तुंगारेश्वरच्या पारोळ बाजूकडील श्री सदानंद महाराज आश्रमाकडे जाणार्‍या रस्त्यावरून जंगलात नेले. या दरम्यान घनदाट जंगलातील रस्त्याच्याकडेला असलेल्या एका निर्जन स्थळी स्कुटी थांबवून आपल्याला काही बोलायचे आहे, सांगून उतरलेल्या नयनाच्या अंगावर स्कुटी घालून जोरदार धडक दिली. या आकस्मिक घटनेत नयना खाली पडली. तिला त्याच स्थितीत झाडीत ओढून नेवून तिच्या डोक्यावर व अंगावर दगड घातला. यामुळे नयना गंभीर जखमी होऊन निपचित पडली. यामुळे ती मेली असल्याचे समजून पती-पत्नी मनोहर व प्रमिलाने तिची पर्स व मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला.

या घटनेच्या रस्त्यावरून संध्याकाळच्या वेळेस श्री सदानंद महाराज आश्रमात गेलेले भाविक आपल्या घराकडे परतत असताना कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज येत असल्याने त्या दिशेने गेले असता नयना सापडली. त्यांनी लागलीच तिला आपल्या रिक्षा मधून खाली आणले आणि नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जवळच्या दवाखान्यात दाखल केले. गंभीर जखमी नयनावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे प्राण वाचले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -