घरक्रीडाचेन्नईने ७ गडी राखत कोलकातावर केली मात

चेन्नईने ७ गडी राखत कोलकातावर केली मात

Subscribe

चेन्नईने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाताने दिलेल्या १०९ धावांचे माफक आव्हान चेन्नईने पूर्ण केले आहे. चेन्नईने आपले सात गडी राखत कोलकाताला पराभूत केले. आजचा सामना अपेक्षेनुसार रोमांचक असा पाहायला मिळाला नाही. कोलकाताचे पाच गडी शुन्यावरच बाद झाले. त्यामुळे २० षटकांत १०८ धावांपर्यंतच कोलकाता मजल मारू शकले. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. गुणतालिकेनुसार चेन्नई आणि कोलकाता यांचा नंबर एकामागे एक पहिला आणि दुसरा असा होता. त्यामुळे सामना रंगतदार असणार, आशी आशा चाहत्यांना होती. परंतु, चेन्नईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांना धूळ चारत १०८ पर्यंतच धावा करू दिल्या.

कोलकाताच्या आव्हानाला सामोरे जाताना चेन्नईचे तीनही गडी स्वस्तात तंबूत परतले. मात्र, फॅफ ड्यू प्लेसिसच्या फलंदाजीमुळे चेन्नईचा विजय झाला. तयाने शेन वॉटसन, सुरेश रैना आणि अंबती रायडू लवकर बाद झाले. अखेर फॅफ डू प्लेसिसने विजय मिळवून दिला.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात आयपीएलच्या १२ वा मोसमातील २३ वा सामना रंगला. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. चेन्नईने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. आयपीएलच्या १२ व्या मोसमात दोन्ही संघांनी आतापर्यंत  चार-चार सामना जिंकले आहे. त्यामुळे गुणतक्त्यात दोघांचे स्थान एकामागे एक असे आहे.

नाणेफेक जिंकूण चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजासाठी आलेल्या कोलाकाताची सुरुवात अत्यंत वाईट झाली. सलामीवीर ख्रिस लिन शुन्यावरच बाद झाला. त्यानंतर सुनील नरिनही ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर नीतीश राणाही शुन्यावर बाद झाला. रॉबिन उथ्थप्पाही फार काही मोठी कामगिरी करु शकला नाही. उंच फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रॉबिन झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिकही फार काही मोठी कामगिरी करु शकला नाही. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल हा नवोदित खेळाडूही बाद झाला. त्यानंतर पीयुष चावलाही ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर कुलदीप याधव, प्रसिध शुन्यावर बाद झाले. आंद्रे रसलने ४४ चेंडूत ५० धावा केल्या. एकट्या रसलने केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाता २० षटकातं ९ बाद १०८ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -