घरक्रीडाहैद्राबादच्या कमबॅकचा चेन्नईला धसका

हैद्राबादच्या कमबॅकचा चेन्नईला धसका

Subscribe

गेल्या तीन सामन्यांमध्ये अपयश मिळाल्यानंतर हैद्राबादने कमबॅक केले तर चेन्नईला मोठा फटका बसू शकतो. हैद्राबादच्या कमबॅकमुळे चेन्नईच्या विजयाची घोडदौड थांबू शकते, त्यामुळे हैद्राबादच्या फलंदाजांना थांबवण्याचे मोठे आव्हान चेन्नईला असणार आहे.

चेन्नई आणि हैद्राबाद यांच्यात आज आयपीएलच्या १२ व्या हंगामातील ३३ वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात हैद्राबाद पुन्हा कमबॅक करुन चेन्नईला धूळ चाळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गेल्या तीन सामन्यांपासून हैद्राबादच्या पदरात अपयश पडत आहे. तर चेन्नईची विजयाची घोडदौड जलद मार्गाने सुरु आहे. मात्र, हैद्राबादने पुन्हा कमबॅक केले तर चेन्नईच्या गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असणार आहे. हैद्राबादजवळ डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो सारखे आक्रमक सलामीवीर आहेत. हे सलामीवीर चालले तर चेन्नईच्या विजयाची घोडदौड थांबवण्यात हैद्राबादला यश मिळू शकते.

आयपीएलच्या १२ व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला खरच टक्कर देणारी कुठली टीम असेल तर ती म्हणजे सनरायजर्स हैद्राबाद. या दोन्ही संघाकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. हैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्स आपल्या संघाचं नेतृत्व अगदी नाविन्यपूर्ण करत आहे. मात्र, गेल्या तीन सामन्यांमध्ये हैद्राबादला हवे तसे यश मिळालेले नाही. या मोसमाच्या सुरुवातीला पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर हैदराबादने जबरदस्त कमबॅक करत सलग तीन सामने जिंकले होते. या तिनही सामन्यांमध्ये हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे इतर संघातील गोलंदाजांना या जोडीच्या बाबतीत धस्का बसला होता. मात्र जसजशी स्पर्धा पुढे रंगत गेली. तसतसे हैदराबादच्या संघातील खरे रहस्य उलगडत गेले. सलामीवीर सोडले तर विजय शंकर, मनीष पांडे, दीपक हुडा, युसूफ पठान या मधल्या फळीतील फलंदाज १२ व्या मोसमात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आलेल्या संघाची घसरण आज सहाव्या क्रमांकावर झाली आहे. हैद्राबादचे भुवनेश्वर कुमार, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे.

- Advertisement -

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचे नेतृत्व अगदी लिलया पेलले आहे. चेन्नईने या मोसमात आठ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवत आपली विजयाची घोडदौड सुरू ठेवली आहे. आतापर्यंतच्या खेळीत चेन्नईने उत्तम कामगिरी करत गुणतालिकेत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. चेन्नईजवळ फॅफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, शेन वॉटसन सारखे शिलेदार आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत निवड न झाल्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अंबाती रायडू झटणार आहे. चेन्नईचे गोलंदाज इम्रान ताहीर, हरभजन सिंग याच्या गोलंदाजीकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -