घरक्रीडापंजाबचा दिल्लीवर १४ धावांनी विजय

पंजाबचा दिल्लीवर १४ धावांनी विजय

Subscribe

नाणेफेक जिंकूण दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पंजाबने दिल्लीला १४ धावांनी पराभूत केले आहे . पंजाबचा वेगवान गोलंदाज सॅम करनने हॅट्रीक बळी घेत दिल्लीला १४ धावांनी धुळ चारली. पंजाबने २० षटकात १६६ धावा केले होते. त्यामुळे १६७ धावांचे आव्हान दिल्ली समोर उभे राहिले. परंतु, हे आव्हान दिल्ली पुर्ण करु शकली नाही. दिल्लीचा १५२ धावांवरच बाजार बंद केला. त्यामुळे १४ धावांनी पंजाबचा विजय झाला.

दिल्लीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

दिल्ली आणि पंजाब यांच्यात चंदिगडच्या मोहाली येथील पीसीए आयएस बिंद्रा स्टेडिअम या मैदानावर सामना रंगला. या सामन्यात नाणेफेक जिंकूण दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळीला आलेल्या पंजाबच्या के. एल. राहुल या गडीने धडाकेबाज सुरुवात केली. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावला. परंतु त्याची ही आक्रमक खेळी फार काळ टीकू शकली नाही. अवघ्या १५ धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर सॅम करन मैदानावर आला. परंतु, सॅम आज फार काही मोठी कामगिरी करु शकला नाही. त्याने १० चेंडूत २० धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर आलेला मयंक अग्रवालही ६ धावांवर बाद झाला. तो धावबाद झाला. यानंतर सर्फराज खानने २९ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले. परंतु, तोही बाद झाला. त्यानंतर हार्डस वेल्जोएन, कर्णधार अश्र्विन बाद झाले. अखेर २० षटकात पंजाबने १६६ धावा केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -