घरक्रीडाअर्धशतकाला मुकला पण राजस्थानला जिंकवून गेला

अर्धशतकाला मुकला पण राजस्थानला जिंकवून गेला

Subscribe

राजस्थानने ३ गडी राखत कोलकाताचा पराभव केला. कोलताने दिलेल्या १७६ धावांचे आश्वासक आव्हान राजस्थानने सहज पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात रियाग परागची भूमिका महत्त्वाची ठरली.

राजस्थान रॉयल आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी जबदरस्त सामना रंगला. राजस्थानने घरच्या मैदानावर कोलकाताला धूळ चारली आणि ३ गडी राखत कोलकाताचा पराभव केला. राजस्थानच्या या विजयात रियाग परागची महत्त्वाची भूमिका ठरली. त्याने जोफ्रा आर्चर सोबत भागीदारी करत ३१ चेंडूत ४७ धावा केल्या आणि राजस्थाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकात तो हिट विकेट झाला. मात्र जोफ्रा आर्चरने कोलकाताचे सहज आव्हान पूर्ण केले.

राजस्थान आणि कोलकाता यांच्यात गुरुवारी आयपीएलच्या १२ व्या हंगामातील ४३ वा सामना खेळला गेला. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. परंतु, राजस्थानने कोलकाताच्या घरच्या मैदानावर पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानचा हाच निर्णय योग्य ठरला. कोलकाताने राजस्थानपुढे १७६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने ३ गडी राखत पूर्ण केले. हा सामना अटीतटीचा बघायला मिळाला. कारण हा सामना राजस्थानच्या हातातून सूटताना दिसत होता. मात्र, राजस्थानने आपल्या वज्रमुठीत सामना घट्ट पकडला आणि सहज खिशात घातला.

- Advertisement -

कोलकाताने दिलेल्या आव्हानाला सामोरे जाताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसनने पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. रहाणेने २१ चेंडूत ३४ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटक मारले. परंतु, रहाणे नंतर काही धावांचा अंतरावर एका मागे एक गडी तंबूत परतू लागले. संजू सॅमसनही लगेच बाद झाला. त्याने १५ चेंडूत २२ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, स्टुअर्ट बिन्नी या खेळाडूंकडे जास्त अपेक्षा होती. मात्र, काही धावांच्या अंतरावर ते लवकर बाद झाले. एकीकडे आपले साथीदार बाद होत असताना रियाग परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने आपला फटकाराची मालिका सुरु ठेवली. परंतु, शेवच्या षटकात तो हिट विकेट झाला. परंतु, तोपर्यंत राजस्थानला त्याने विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेले होते. त्यामुळे राजस्थानने सहज कोलकाताचा ३ गडी राखत पराभव केला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताची सुरुवातच वाईट झाली. सलामीवीर ख्रिस लीन शुन्यावर बाद झाला. त्यानंतर शुभग गीलही १४ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. नितीश राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिकने भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीशही बाद झाला. त्यापाठोपाठ सुनील नरिन, आंद्रे रसेल आणि कॅरलोस काही अंतरांच्या धावांवर बाद झाले. मात्र, एकीकडे आपले सर्व साथीदार बाद होत असताना कर्णधार दिनेश कार्तिक एकतर्फी खेळी करत लढत राहिला. त्याने शेवटपर्यंत फटकारे मारले. कार्तिकने ५० चेंडूत ९७ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ षटकार आणि ७ चौकार मारले. कार्तिकच्या या खेळीमुळे कोलकाताने आश्वासक धावांपर्यंत मजल मारील. कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७५ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -