Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : भारतात बायो-बबलवर टीका करणाऱ्या झॅम्पाचा विधानावरून यु-टर्न, म्हणाला...

IPL 2021 : भारतात बायो-बबलवर टीका करणाऱ्या झॅम्पाचा विधानावरून यु-टर्न, म्हणाला…

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे झॅम्पा म्हणाला.   

Related Story

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा गुरुवारी मेलबर्नमध्ये सुरक्षितरित्या दाखल झाले. भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने या दोघांनी काही दिवसांपूर्वी यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर झॅम्पाने आयपीएल आणि भारतातील बायो-बबलवर टीका केली होती. आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो-बबल वातावरणात राहून खेळलो आहोत. माझ्या मते, भारतातील बायो-बबलचे वातावरण सर्वात असुरक्षित असल्याचे झॅम्पा म्हणाला होता. मात्र, त्याने या विधानावरून यु-टर्न घेतला आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे तो म्हणाला.

बीसीसीआयने योग्य ती काळजी घेतली

मी आणि केन सुरक्षितरित्या मेलबर्नला पोहोचलो आहोत. मला सर्वात आधी एका गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. आयपीएलमधील बायो-बबलमध्ये असुरक्षित वाटत असल्याचे मी म्हणालो होतो, पण कोरोनाचा बबलमध्ये शिरकाव होईल असा माझ्या विधानाचा अर्थ नव्हता. बीसीसीआय आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने योग्य ती काळजी घेतली होती. आम्हाला सुरक्षित वाटावे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. आम्ही आता आयपीएलमधून माघार घेतली असली तरी ही स्पर्धा नक्की पूर्ण होईल याची मला खात्री आहे, असे झॅम्पा म्हणाला.

स्वतःच तिकिटे बुक करून ऑस्ट्रेलिया गाठले

- Advertisement -

रिचर्डसन आणि झॅम्पा हे यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होते. परंतु, भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन त्यांनी आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. या दोघांना ऑस्ट्रेलियात परतण्यासाठी विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे या दोघांनी स्वतःच तिकिटे बुक करून ऑस्ट्रेलिया गाठले. त्यांनी आधी भारत ते दोहा असा प्रवास केला आणि त्यानंतर ते दोहाहून मेलबर्नमध्ये दाखल झाले.

 

- Advertisement -