घरताज्या घडामोडीसलग सुटयांमुळे पर्यटन स्थळांवर पोलीसांचा वॉच

सलग सुटयांमुळे पर्यटन स्थळांवर पोलीसांचा वॉच

Subscribe

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, गर्दी नियंत्रणाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानूसार सलग आलेल्या सुटयांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व धरणे, धबधबे, पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पोलीसांची नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी पर्वतास घालण्यात येणारी प्रदक्षिणा बंद करण्यात आली आहे. प्रदक्षिणा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमभंग करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला.

कोरोना निर्बंधात स्वातंत्र्यदिनापासून शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका आणि कोरोनाचा धोका कायम असल्याने वाढते संकट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरत आहे. ‘ब्रेक द चेन’ चे निर्बंध शिथिल केल्यानंतर अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत असल्याचे समोर आले आहे. यंदा शनिवार, रविवारी स्वातंत्र्यदिन आणि सोमवारी पारशी नुतनवर्ष दिनानिमित्त शासकीय सुटी असल्याने अनेकांकडून पर्यटनाचे प्लॅन आखले जात आहेत. परंतु आता पर्यटन स्थळांवर गर्दी करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस अर्लट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचे काही दिवसांमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीसांनी कडक इशारा दिला आहे.

- Advertisement -

प्रदक्षिणा मार्गावर पोलीस गस्त
कोविडमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून यंदाच्यावर्षीही श्रावणी सोमवारनिमित्त करण्यात येणारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस बंदी आहे. प्रदक्षिणेस काही भक्त महिनाभर पायी जाण्याचा नियम करतात, तर काही श्रावण सोमवारी, तर काही फक्त तिसर्‍या श्रावण सोमवारी हजेरी लावतात. परंतु यंदा प्रदक्षिणा मार्गावर पोलीस गस्त असणार आहे तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात येणार आहे.

पर्यटन स्थळांवर नाकाबंदी
पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणार्‍या मार्गावर ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तातही वाढ केली आहे. विशेत: धबधबे, त्याभोवतालच्या रिसोर्टवर स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून लक्ष असून गर्दी दिसल्यास कारवाई केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेसॉर्टमध्ये शासकीय नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावी, अशा सूचना रेसॉर्ट चालकांना देण्यात आल्या आहेत.
सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -