Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : KKR ची गोलंदाजी; पंजाबने दिली जॉर्डनला संधी 

IPL 2021 : KKR ची गोलंदाजी; पंजाबने दिली जॉर्डनला संधी 

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे.

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. या सामन्यापासून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताला यंदाच्या मोसमात चांगला खेळ करता आलेला नाही. त्यांनी आतापर्यंत पाच पैकी केवळ एक सामना जिंकला आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी संघात बदल करणे टाळले आहे. त्यांच्या संघात कर्णधार मॉर्गन, सुनील नरीन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स हे चार परदेशी खेळाडू आहेत.

अ‍ॅलनच्या जागी जॉर्डन

- Advertisement -

दुसरीकडे पंजाबने आतापर्यंत पाच पैकी दोन सामने जिंकले आहेत. सलग तीन पराभवांनंतर त्यांनी मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. मात्र, त्यांनी आजच्या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू फेबियन अ‍ॅलनच्या जागी त्यांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला संधी दिली आहे. जॉर्डन टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

- Advertisement -