घरक्रीडाIPL 2021 : धोनीविना चेन्नई सुपर किंग्स संघ अधुरा - प्रशिक्षक फ्लेमिंग

IPL 2021 : धोनीविना चेन्नई सुपर किंग्स संघ अधुरा – प्रशिक्षक फ्लेमिंग

Subscribe

धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडून आता एकूण २०० सामने खेळले आहेत.

आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी हा सामना खास ठरला. त्याचा हा चेन्नईसाठी २०० वा सामना होता. धोनी आणि चेन्नई हे आता एक समीकरणच झाले असून धोनीविना चेन्नईचा संघ अधुरा आहे, असे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनी खूप महत्वाचा आहे. त्याच्याविना हा संघ अधुरा आहे. तो ज्याप्रकारे संघाचे नेतृत्व करतो, खेळाडूंना मार्गदर्शन करतो, त्याची कामगिरी, याचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे फ्लेमिंग म्हणाले. चेन्नईकडून २०० सामने खेळणारा धोनी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

इतका काळ खेळणे सोपे नाही

आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली आणि पहिल्या मोसमापासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. याबाबत फ्लेमिंग म्हणाले, धोनीचे कौतुक करावे तितके कमीच आहे. इतका काळ सातत्याने क्रिकेट खेळणे सोपे नाही. एकाच संघासाठी २०० सामने खेळणे आणि इतक्या सामन्यांनंतरही या फ्रेंचायझीसाठी चांगली कामगिरी उत्सुक असणे, हे धोनीविषयी खूप काही सांगते.

- Advertisement -

धोनीचे सामन्यांचे द्विशतक

धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडून आता एकूण २०० सामने खेळले असून यापैकी १७६ सामने त्याने आयपीएलमध्ये, तर २४ सामने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. दरम्यान, २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून ३० सामने खेळले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -