घरक्रीडाIPL 2021 : राजस्थानची प्रथम गोलंदाजी; ऋतुराज गायकवाड CSK संघात कायम  

IPL 2021 : राजस्थानची प्रथम गोलंदाजी; ऋतुराज गायकवाड CSK संघात कायम  

Subscribe

दोन्ही संघांनी बदल करणे टाळले आहे.   

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले. त्यामुळे त्यांनी बदल करणे टाळले आहे. चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. त्यांनी संघात बदल करणे टाळले असून सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पुन्हा संधी दिली आहे. ऋतुराजला पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ १० धावा करता आल्या आहेत. मात्र, वानखेडेवर सुरुवातीला फलंदाजी करणे अवघड असते. त्यामुळे सलामीवीर लवकर बाद होऊ शकतात, असे म्हणत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजवर विश्वास दाखवला.

दुसरीकडे राजस्थानने मुंबईकर डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी देणे टाळले आहे. पहिल्या दोन सामन्यांत सलामीवीर मनन वोहराला चांगली कामगिरी करता आली नाही. असे असले तरी तोच जॉस बटलरच्या साथीने राजस्थानच्या डावाची सुरुवात करेल. राजस्थानच्या संघात बटलर, डेविड मिलर, क्रिस मॉरिस आणि मुस्ताफिझूर रहमान हे चार परदेशी खेळाडू आहेत.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -