घरक्रीडाIPL 2021 : हर्षल पटेल किंवा पडिक्कल नाही, गावस्करांना RCB च्या ‘या’ खेळाडूने...

IPL 2021 : हर्षल पटेल किंवा पडिक्कल नाही, गावस्करांना RCB च्या ‘या’ खेळाडूने केले प्रभावित 

Subscribe

बंगळुरूने या मोसमात दमदार कामगिरी करताना ७ पैकी ५ सामने जिंकले होते.

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले होते. मात्र, त्याआधी झालेल्या २९ सामन्यांमध्ये चाहत्यांचे बरेच मनोरंजन झाले होते. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने या मोसमात दमदार कामगिरी करताना ७ पैकी ५ सामने जिंकले होते. तसेच त्यांनी मोसमाची सुरुवात सलग चार विजय मिळवत केली होती. त्यांच्या या दमदार कामगिरीमध्ये युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने महत्वाची भूमिका बजावली होती. पडिक्कलने एक शतके केले होते, तर हर्षलने स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सर्वाधिक विकेट (१७) घेतल्या होत्या. मात्र, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना या दोघांपेक्षाही ग्लेन मॅक्सवेलने अधिक प्रभावित केले.

मॅक्सवेल सरप्राईज पॅकेज

बंगळुरू संघाने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली होती आणि या यशाचे सर्वाधिक श्रेय एबी डिव्हिलियर्सला जाते. युवा देवदत्त पडिक्कलने उत्कृष्ट शतक केले होते आणि भविष्यात तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची दाट शक्यता आहे. परंतु, मला ग्लेन मॅक्सवेलने यंदा सर्वात प्रभावित केले. तो माझ्यासाठी सरप्राईज पॅकेज होता. तो ऑस्ट्रेलियासाठी खेळताना जशी कामगिरी करतो, तशी त्याने या आयपीएलमध्ये केली, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

परिस्थितीनुसार खेळ केला

मॅक्सवेलमध्ये खूप प्रतिभा आहे. परंतु, त्याला आयपीएलमध्ये या प्रतिभेला न्याय देता येत नव्हता. यंदाचा मोसम मात्र त्याने गाजवला. त्याने यंदाच्या मोसमात परिस्थितीनुसार, समजून खेळ केल्याचेही गावस्कर यांनी सांगितले. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचेही त्यांनी कौतुक केले. सामन्यागणिक त्याच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -