घरCORONA UPDATEcorona vaccination: कोरोनामुक्त झालेल्या नागरिक ९ महिन्यानंतर घेऊ शकतात लस, NTAGI चा...

corona vaccination: कोरोनामुक्त झालेल्या नागरिक ९ महिन्यानंतर घेऊ शकतात लस, NTAGI चा सल्ला

Subscribe

देशात कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचें प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. परंतु कोरोनामुक्त झालेल्या या नागरिकांनी लस केव्हा घ्यावी यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण आरोग्य तज्ज्ञांकडून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी किती दिवसांनी लस घ्यावी यावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेले नागरिकही आपण लस केव्हा घ्यावी याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. याचदरम्यान केंद्रीय आरोग्य समितीने कोरोनामुक्त झालेले नागरिक ९ महिन्यांनंतर कोरोनाविरोधी लस घेऊ शकतात असा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (NTAGI) हा सल्ला दिला आहे. यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना सहा महिन्यानंतर लस घेऊ शकतात असे NTAGI ने सुचविले होते. परंतु समितीने आता ८ महिन्यांनंतर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना लस दिली पाहिजे असा केंद्राला दिला आहे.

सल्लागार समितीने कोविशिल्टच्या दोन डोसमधील फरक १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली तेव्हाच कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना ९ महिन्यांनंतर लस दिली पाहिजे यासंदर्भात निर्णय घेतला. यापूर्वी कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ८ आठवडे होते. परंतु या तज्ज्ञांच्या समितीने लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा दोन्ही डेटा पाहिला, ज्यामध्ये लसीकरणानंतर कोणत्याही नागरिकाला पुन्हा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

- Advertisement -

अँटीबॉडीस वाढवण्यासाठी होईल मदत

यावर सामितीने सांगितले की, लसीच्या पहिल्या डोसमधील अंतर वाढल्यास कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी शरीरात योग्य अँडीबॉडीस तयार होण्यास मदत होते. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कोरोनाबाधित रुग्णांचा लसीकरणासाठी मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. समितीने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लसीकरणासाठी पात्र असल्याचे स्पष्ट करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय दोन दिवसांत या निर्णय घेईल असे सांगितले. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या नागरिकांना लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ महिन्यांचे असणे सुरक्षित आहे.

NTAGI समितीने यापूर्वी सांगितले होते की, लसीचा पहिला डोस मिळाला आणि दुसर्‍या डोस देण्याच्या आधीच जर कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना संसर्गातून बरे झाल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांपर्यंत थांबावे लागेल. तसे असेही सुचित केले की, ज्या रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा कांवलेसंट प्लाझ्मा देण्यात आले होता अशांना रुग्णांना डिस्चार्ज दिलेल्या दिवसापासून तीन महिन्यांनंतर लस दिली जाऊ शकते.

- Advertisement -

तर समितीने गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य यंत्रणाला सुचवले होते की, ज्या लोकांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यासारखी किंवा आयसीयूमध्ये भर्ती करण्याएवढा काही गंभीर आजार असल्यास दुसऱ्या लसीच्या डोससाठी ४ ते ८ आठवडे थांबावे लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सध्याच्या प्रोटोकॉलनुसार कोरोनासंसर्गातून बरे झालेल्या रुग्णाला ४ ते ८ आठवड्यांनंतर लस दिली जावी आणि विशेषत: गर्भवती व स्तनपान देणाऱ्या महिलांना इंजेक्शन देऊ नये.


केवळ ३३० रुपये वार्षिक प्रीमियम भर मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या मोदी सरकारची योजना


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -