Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2021 : चिंता नाही! भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित; डी कॉकने झॅम्पाला...

IPL 2021 : चिंता नाही! भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित; डी कॉकने झॅम्पाला सुनावले

सामना खेळताना किंवा अगदी सराव करताना आम्हाला इतर गोष्टींचा विचार करावा लागत नाही, असे डी कॉक म्हणाला.

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅडम झॅम्पाने काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने आयपीएल आणि भारतातील बायो-बबलवर जोरदार टीका केली होती. आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो-बबल वातावरणात राहून खेळलो आहोत. माझ्या मते, भारतातील बायो-बबलचे वातावरण सर्वात असुरक्षित असल्याचे झॅम्पा म्हणाला होता. परंतु, झॅम्पाच्या या मताशी मुंबई इंडियन्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू क्विंटन डी कॉक अजिबातच सहमत नाही. इतरांचे माहित नाही, पण मला भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित वाटते, असे डी कॉकने स्पष्ट केले.

अजिबातच चिंता वाटत नाही

आम्हाला आमच्या (मुंबई इंडियन्स) डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला भारतातील बायो-बबलमध्ये पूर्णपणे सुरक्षित वाटते. इतरांचे माहित नाही, पण मला बबलमध्ये राहताना अजिबातच चिंता वाटत नाही. आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. इतर संघांतील खेळाडूंना बायो-बबलविषयी काय वाटते, हे मी सांगू शकत नाही. परंतु, मी आमच्या संघाच्या खेळाडूंविषयी बोलू शकतो. आम्हाला सर्वांना भारतातील बायो-बबलमध्ये सुरक्षित वाटत आहे. सामना खेळताना किंवा अगदी सराव करताना आम्हाला इतर गोष्टींचा विचार करावा लागत नाही, असे डी कॉक म्हणाला.

फलंदाजी करताना मजा आली

- Advertisement -

डी कॉकने गुरुवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने हा सामना ७ विकेट राखून जिंकला. मुंबईचे सुरुवातीचे पाच सामने चेन्नईत झाले होते. तिथे धावा करणे खूप अवघड होते. मात्र, दिल्लीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना मजा आल्याचे राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर डी कॉकने सांगितले.

- Advertisement -