घरक्राइममुंबईकरांनो सावधान, बोगस सही करून खात्यातील पैसे उडवले, चार जणांना अटक

मुंबईकरांनो सावधान, बोगस सही करून खात्यातील पैसे उडवले, चार जणांना अटक

Subscribe

बोगस सही करून ग्राहकांच्या बँक अकाऊंटमधून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून या आरोपींमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. हा बँक कर्मचारी सहज बोगस सही करता येईल, असे अकाऊंट शोधून त्यातून पैसे काढत असल्याचा आरोप आहे. आरोपी अकाऊंट मिळाल्यानंतर एनईएफटीद्वारे बनावट अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होते. अशाप्रकारे एका महिलेच्या अकाऊंटमधून तब्बल 18 लाख रुपये काढण्यात आले. जेव्हा संबंधीत महिला बँकेत पैसे काढण्यासाठी गेली तेव्हा तिला संबंधित प्रकार पाहून धक्काच बसला.

आपल्या बँक अकाऊंटमधून कोणतीही माहिती न देता कुणीतरी परस्पर पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास करत याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

ग्रेटर बॉम्बे को ऑपरेटीव्ह बँकेचा कर्मचारी सुरेश पवार याला पोलिसांनी अटक करत त्याची चौकशी सुरु केली, या तपासादरम्यान चौकशीअंत पोलिसांनी अख्तर मुस्ताक कुरेशी, एजाज शमशुद्दीन खान आणि साकीर मोहम्मद उमर सलमानी यांना दहिसरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन तपास केला असता सर्व बनावट अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. दरम्यान या टोळीत आणखी काही आरोपी सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ग्रेटर बॉम्बे को ऑपरेटीव्ह बँकेत बनावट सही करून एनईएफटीच्या माध्यमातून पैसे काढण्याचे हे फसवणूकीचे प्रकरण प आले होते. या फसवणूकी प्रकरणी तपास करत दहिसर पोलिसांनी एका टोळीला जेरबंद केले आहे. रेणू यादव (रा,दहिसर पूर्व) या महिलेच्या अकाऊंटमधून संबंधित टोळीने 18 लाख रुपये एनईएफटीद्वारे ट्रान्सफर करुन त्यांच्या बनावट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करुन घेतले. यासाठी एका बँक कर्मचाऱ्याने आधी रेणू यादव यांचे अकाऊंट शोधून काढले. त्यानंतर त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले.

- Advertisement -

ही संबंधित महिल बँकेत पैसे काढण्यासाठी गेली तेव्हा तिला हा सारा प्रकार लक्षात आला. यानंतर महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी तपास करत आत्तापर्यंत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.


Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य; म्हणाला “मी महाराष्ट्रात भरपूर…”

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -