घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव

IPL 2022 : आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव

Subscribe

कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळं गतवर्षी इंडियन प्रिमीयर लीग आयपीएल प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आली होती. तसंच, आयपीएलच्या आयोजनावेळी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बायो बबल तयार करण्यात आलं होतं. यंदा आयपीएलचे 15 वे पर्व असून, यंदाही खेळाडूंसाठी बायो बबलची निर्मीती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळं गतवर्षी इंडियन प्रिमीयर लीग आयपीएल प्रेक्षकांविनाच खेळवण्यात आली होती. तसंच, आयपीएलच्या आयोजनावेळी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बायो बबल तयार करण्यात आलं होतं. यंदा आयपीएलचे 15 वे पर्व असून, यंदाही खेळाडूंसाठी बायो बबलची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र खेळाडूंसाठी सुरक्षित असणाऱ्या या बायो बबलमध्ये आता कोरोनाने शिरकावं केला आहे. त्यामुळं आयपीएलच्या 15 व्या पर्वावरही कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आयपीएलने याबाबतची माहिती दिली आहे. पॅट्रिक फरहार्ट संध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. बायो बबलमध्ये असणारे पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाल्यानं इतर खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान गतवर्षी कोरोना महामारीमुळे 4 मे 2021 रोजी आयपीएल अर्ध्यातूनच थांबवावी लागली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते. तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.

दारूच्या नशेत तोडलं बायो बबल

- Advertisement -

दारुच्या नशेत खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह पोलिसांना आवरला नाही, ते थेट बायो बबल तोडून फोटो काढण्यासाठी गेले. या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा कोरोना महामारीमुळं मुंबई आणि पुण्यातील मैदानावर आयपीएलमधील लीग सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार, डी. वाय. पाटील मैदानावर सोमवारी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना झाला. या सामन्यावेळी खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह पोलिसांना आवरला नाही. त्यामुळं फोटोसाठी पोलिसांनी बायो बबल तोडलं.


हेही वाचा – जो रुटने दिला इंग्लंडच्या कसोटी संघाचा राजीनामा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -