घरक्रीडाIPL 2022 Mega Auction : खेळाडूंच्या लिलावापूर्वीच अहमदाबादने घेतले ३ खेळाडू, हार्दिक...

IPL 2022 Mega Auction : खेळाडूंच्या लिलावापूर्वीच अहमदाबादने घेतले ३ खेळाडू, हार्दिक पंड्याकडे संघाची कमान

Subscribe

लखनऊने भारताचा आगामीचा खेळाडू केएल राहुलकडे कर्णधारपद दिले आहे. तसेच फ्रेंचायझीने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिस आणि भारतीय युवा स्पिनर रवि बिश्नोईला संघात घेतलं आहे.

इंडियन प्रिमियर लीगची नविन फ्रेंचायझी अहमदाबादने आयपीएल खेळाडूंच्या लिलावापूर्वीच ३ खेळाडूंची निवड केली आहे. आयपीएलच्या नियमानुसार नव्या फ्रेंचायझीला मेगा ऑक्शनपूर्वीच तीन खेळाडूंची निवड करायची होती. अहमदाबादकडून भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आणि भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल यांचे संघातील स्थान निश्चित केलं आहे. हार्दिक पंड्याला अहमदाबादने १५ करोड रुपयांमध्ये खरेदी केल आहे. तसेच फ्रेंचायझीने लेग स्पिनर राशिद खानला १५ करोड रुपये देऊन संघात घेतलं आहे. तर शुभमन गिलला फ्रेंचायझीने ८ करोड रुपयांमध्ये संघात घेतलय.

अहमदाबादच्या खात्यात आताही मेगा ऑक्शनसाठी ९० करोड रुपये होते. ज्यामध्ये त्यांनी तीन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी केवळ ३८ करोड रुपये खर्च केले आहेत. यामुळे लिलावासाठी अहमदाबादकडे ५२ कोटी रुपये आहेत.

- Advertisement -

लखनऊनच्या संघात ३ खेळाडू निश्चित

बीसीसीआयने आयपीएलमधील दोन्ही संघ लखनऊ आणि अहमदाबादला २५ जानेवारीपर्यंत तीन-तीन खेळाडूंची निवड करण्यासाठी वेळ दिला होता. शुक्रवारी लखनऊच्या संघाने तीन खेळाडूंची निवड निश्चित केली आहे. लखनऊने भारताचा आगामीचा खेळाडू केएल राहुलकडे कर्णधारपद दिले आहे. तसेच फ्रेंचायझीने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिस आणि भारतीय युवा स्पिनर रवि बिश्नोईला संघात घेतलं आहे.

४९ खेळाडूंची बेस प्राइज २ करोड रुपये

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये ४९ खेळाडूंची बेस प्राइज २ करोड रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये १७ खेळाडू भारतीय आणि ३२ खेळाडू परदेशी आहेत. या खेळाडूंच्या यादीत फलंदाज शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, सुरेश रैना आहे. तर अनेक खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राइज दीड करोड रुपये आहे. बीसीसीआय गव्हर्निंग काउंसिल रजिस्टर खेळडूंच्या यादी काही दिवसांमध्ये बनवण्यात येईल. बीसीसीआयनुसार एक फ्रेंचायझी जास्तीत जास्त २५ खेळाडू आपल्या संघात घेऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा : IND vs SA, 3rd ODI : तिसऱ्या वनडेत सन्मान वाचवण्यासाठी उतरणार टीम इंडिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -