घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावे षटकारांचा विक्रम, दुसऱ्या क्रमांकावर कोणता...

IPL 2022 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावे षटकारांचा विक्रम, दुसऱ्या क्रमांकावर कोणता संघ?

Subscribe

जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग म्हणजेच आयपीएलचा १५ हंगामासाठी अवघ्या काही दिवसांचा वेळ उरला आहे. सगळ्या संघांनी हंगामासाठी कंबर कसली आहे. यंदा मालिकेची सुरुवात मागील वर्षीच्या विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाइट रायडर्सच्या संघांमध्ये होणार आहे.

मैदानावर सामन्यादरम्यान चौकार आणि षटकारांमुळे प्रेक्षक आयपीएलला अधिक पसंती देतात. मागील हंगामात एकूण ६८७ षटकार सगळ्या संघांकडून मारण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ११५ षटकार चॅम्पियन चैन्नईच्या फलंदाजांनी मारले आहेत. यामुळे चाहत्यांना आशा आहे की, यंदाही खेळाडू षटकारांचा पाऊस पाडतील. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार कोणत्या संघाने मारले आहेत ते जाणून घ्या.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सच्या नावे १३०८ षटकार

आयपीएलच्या १५ हंगामाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रोहित शर्मा नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या नावे आहे. मागील १४ हंगामात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी २१७ सामन्यात एकूण १ हजार ३०८ षटकार मारले आहेत. म्हणजेच प्रत्येक सामन्यात ६ षटकार मारले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा संघ

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करणाऱ्या तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा संघ आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे नेतृत्व विराट करत होता. आरसीबीने २११ सामन्यांत एकूण १२७५ षटकार मारले आहेत. आरसीबीच्या खेळाडूंनीसुद्धा प्रत्येक सामन्यात ६ षटकार मारले आहेत.

- Advertisement -

पंजाब आणि चेन्नईमध्ये १ षटकाराचे अंतर

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम करण्याबाबत तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्ज आहे. पंजाबने १४ हंगामात २०४ सामन्यात ११६६ षटकार मारले आहेत. म्हणजेच प्रत्येक सामन्यात पंजाबचे खेळाडू ५ ते ६ षटकार मारतात. या यादीत चौथ्या क्रमांकावर एमएसधोनीची चेन्नई सुपर किंग्ज आहे. सीएसकेने १२ हंगामात १९५ सामने खेळले यामध्ये एकूण ११६५ षटकार मारले आहेत. सीएसकेचे खेळाडूसुद्धा प्रत्येक सामन्यात ६ षटकार मारतात.

शेवटच्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद

षटकारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्स आणि सहाव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. केकेआरच्या खेळाडूंनी आतापर्यंत १११३ आणि दिल्लीच्या खेळाडूंनी १०४१ षटकार मारले आहेत. राजस्थान रॉयल्स ८७४ आणि सनरायझर्स हैदराबादने ६८० षटकारांसह आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या संघातील खेळाडू सरासरी प्रत्येक सामन्यात ५ षटकार मारले आहेत. हैदराबादच्या संघाने प्रत्येक सामन्यात ५ षटाकर मारले आहेत.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलमुळं रातोरात बदललं खेळाडूचं नशीब, २०० रुपयांसाठी खेळायचा सामना आता झालाय करोडोंचा मालक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -