घरक्रीडाIPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला IPLमध्ये पदार्पण करण्याची संधी, मुंबई इंडियन्सकडून...

IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला IPLमध्ये पदार्पण करण्याची संधी, मुंबई इंडियन्सकडून फोटो शेअर

Subscribe

आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली झाली नाही. मुंबईला सलग ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संघाला स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ मुंबई आहे. आपला सन्मान वाचवण्यासाठी संघ आपले शेवटचे दोन सामने खेळणार आहे. हा सामना संघासाठी खास असू शकतो कारण त्यात एक बदल अपेक्षित आहे, ज्याची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या सामन्यांमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सकडून एक अर्जुन तेंडुलकरचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

आयपीएलच्या स्पर्धेत मुंबईच्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर सलग ८ सामन्यात पराभव झाला आहे. शेवटच्या सामन्यात संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विजय मिळवून त्यांच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आणल्या. या संघाचा पुढील सामना हैदराबादशी असून त्यानंतर तो दिल्लीच्या संघाशी खेळेल. या सामन्यांमध्येही प्लेऑफचा मुद्दा तसाच आहे. मुंबईसमोर दोन्ही संघांना विजयाची गरज आहे जेणेकरून त्यांना आपल्या आशा जिवंत ठेवता येतील.

- Advertisement -

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता

स्पर्धेत सलग 8 पराभव पत्करून संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असताना अर्जुनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेशाची चर्चा जोरात सुरू आहे. आता संघ त्यांना त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये संधी देऊ शकतो. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून संघ व्यवस्थापन त्याला जसप्रीत बुमराहच्या जागी संधी देऊ शकते. कर्णधार आणि प्रशिक्षक त्यांच्या चॅम्पियन गोलंदाजाला विश्रांती देऊ इच्छित आहेत आणि तरुण खेळाडूला प्रयत्न करण्यास उत्सुक आहेत. अशा स्थितीत त्याला हैदराबाद किंवा दिल्लीविरुद्ध पदार्पणाची संधी मिळू शकते.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सकडून अर्जुनचा फोटो शेअर

मुंभई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरुन अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुनच्या हातामध्ये चेंडू असून तो त्या चेंडूकडे पाहत आहे. त्यावर असे कॅप्शन लिहिण्यात आले आहे की, ‘स्लोवर बॉल टाकू कि फास्टर यॉर्कर, असा विचार करताना अर्जूनला दाखवलं आहे. दरम्यान अर्जुनला संधी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.


हेही वाचा : Women T-20 Challenge 2022 : महिला टी-20 चॅलेंजसाठी बीसीसीआयने केली सर्व संघांची घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -