घरक्रीडा'कर्णधार तुमच्या घरचा शिपाई नाही'; कोलकाता संघाच्या कोचवर पाकिस्तानचा 'हा' क्रिकेटपटू संतापला

‘कर्णधार तुमच्या घरचा शिपाई नाही’; कोलकाता संघाच्या कोचवर पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू संतापला

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट याने संताप व्यक्त केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट याने संताप व्यक्त केला आहे. “कोलकाता संघाचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम खेळाडूंना बिनधास्त खेळीमुळे आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहे. सामन्यातील खेळपट्टी, गोलंदाजांचा प्रकार या साऱ्या गोष्टींचा अंदाज न घेता तो खेळाडूंना आक्रमक क्रिकेट खेळण्याचं ट्रेनिंग देतोय जे योग्य नाही. कारण तुमचा कर्णधार हा तुमचा शिपाई नसतो”, असं सलमान बट्ट म्हटलं.

“ब्रेंडन मॅक्युलम याला प्रशिक्षण देण्यात फार समस्या उद्भवत असतात. फक्त आक्रमक क्रिकेटच माहिती आहे, सामन्याचे पिच कसे आहे, हवामान कसे आहे, पिचवर आपण नक्की किती धावा करू शकतो, एखाद्या ठराविक प्रतिस्पर्धी संघासाठी किती धावा पुरेशा ठरतील, याचा तो कधीच शांतपणे विचार करत नाही. निर्भिडपणे क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली तो खेळाडूंना तर्कशून्य पद्धतीचे क्रिकेट खेळायला लावतो. तुम्ही तुमच्या खेळाडूंना थोडं स्वातंत्र्य द्यायला हवं. तुम्ही जर एखाद्या खेळाडूला संघाचा कर्णधार करत असाल, तर त्याच्याकडून चुका होतील हे तुम्ही गृहित धरायला हवा. तुमचा कर्णधार हा तुमचा शिपाई नाही. त्यामुळे त्याला केवळ तुमच्या आज्ञांचे पालन करायलाच संघात ठेवलंय अशी धारणा करून घेऊ नका”, असं सलमान बट्टने मॅक्युलमला सुनावलं.

- Advertisement -

“PSL मध्ये लाहोर कलंदर्स संघाची अवस्था आम्ही पाहिली आहे. मॅक्युलमच्या भाषेत निर्भिडपणे क्रिकेट खेळणे म्हणजे तुमचे डोके चालवणे बंद करा, सामन्यात काय घडतंय ते न पाहता फक्त फटकेबाजी करत सुटा. तुम्ही १० पैकी ७ गडी गमावले असतील आणि तुमच्याकडे १५ षटकं शिल्लक असतील तरी तो तुम्हाला फटकेबाजी करायलाच सांगतो”, अशा शब्दांत त्याने मॅक्क्युलमवर टीका केली.


हेही वाचा – मुंबई इंडियन्सच्या संघात बदल, दुखापतग्रस्त सूर्यकुमारच्या जागी आकाश मडवलला संधी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -