घरमहाराष्ट्रThackeray group : भाजपाकडून जनतेची फसवणूक, प्रफुल्ल पटेलप्रकरणी ठाकरे गटाची टीका

Thackeray group : भाजपाकडून जनतेची फसवणूक, प्रफुल्ल पटेलप्रकरणी ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ट्वीट करत भाजपावर शरसंधान केले आहे. भाजपाने जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

- Advertisement -

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (यूपीए) नागरी विमान वाहतूकमंत्री असलेले प्रफुल्ल पटेल आणि एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप होते. हे प्रकरण एअर इंडियाकडून मोठ्या संख्येने विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित आहे, ज्यामुळे राष्ट्रीय वाहकाचे मोठे नुकसान झाले आहे तर, खासगी व्यक्तींना आर्थिक लाभ झाला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, विमान भाड्याने घेण्याची व्यवस्था तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखालील नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (एनएसीआयएल) केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017मध्ये तपास सुरू करणाऱ्या सीबीआयने नुकताच विशेष न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला.

हेही वाचा – Loksabha 2024: श्रीनिवास पाटील यांची माघार; शरद पवार करणार नव्या उमेदवाराची घोषणा

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपावर टीका केली आहे. कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला गेला, विमान घोटाळ्यात तब्बल 840 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे भाजपा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने सांगितले गेले. पण आता प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाशी सलगी केल्यानंतर मात्र त्यांना ‘क्लीनचीट’ मिळाली आहे. अशा प्रकारे भाजपाने जनतेची फसवणूकच केली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Thackeray Group : ‘ईडीचे पाहू…आधी ते 15 लाख तर द्या; उद्धव गटाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -