घरक्रीडाIPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी यादी जाहीर, ५९० खेळाडूंवर...

IPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी यादी जाहीर, ५९० खेळाडूंवर बोली लागणार ; जाणून घ्या

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा लिलावासाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मेगा लिलावासाठी ५९० खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. तर दोन कोटींच्या बेस प्राईससाठी ४८ खेळाडूंच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. मेगा लिलावासाठी १९ देशांतील १ हजार २१४ खेळाडूंच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. यामधून अंतिम ५९० खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.

३७० भारतीय आणि २२० विदेशी खेळाडू

आयपीएलच्या लिलावात ५९० खेळाडूंमधून ३७० भारतीय आणि २२० विदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. लिलावामध्ये भारतानंतर ऑस्ट्रेलिया संघातून ४७ खेळाडू आहेत. ५९० खेळाडूंमधून २२८ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे ३३५ खेळाडू असे आहेत ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलेलं नाहीये. त्याचसोबतच सात खेळाडू नेपाळ आणि स्कॉटलँड या देशातील आहेत.

- Advertisement -

दोन कोटींच्या बेस प्राईससाठी ४८ खेळाडू

आयपीएलच्या लिलावासाठी फायनल झालेल्या यादीत ४८ खेळाडूंना बेस प्राईस दोन कोटींचं इतकं देण्यात आलंय. तर २० खेळाडूंची बेस प्राईस दीड कोटी इतकी आहे. त्याचप्रमाणे एक कोटींमध्ये ३४ खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि टीम अहमदाबाद असे दहा संघ लिलावात उतरणार आहेत.

यंदाचा आयपीएलचा हंगाम क्रिकेट प्रेमींसाठी खूप रोमांचक ठरणार आहे. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ संघांचा समावेश होता. परंतु यंदाच्या हंगामात एकूण १० संघ खेळताना दिसणार आहेत. टीम वाढल्यामुळे स्पर्धेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चाहत्यांनाही आयपीएलचे एकाहून एक अधिक चांगले सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.


हेही वाचा : Zer0 Sum Budget : मोदी सरकारचं झीरो सम बजेट, अर्थसंकल्पावर राहुल गांधींचा निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -