घरठाणेठाण्यात रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणावर तूर्तास कारवाई नाही, रावसाहेब दानवेंचा खुलासा

ठाण्यात रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणावर तूर्तास कारवाई नाही, रावसाहेब दानवेंचा खुलासा

Subscribe

ठाण्यातील कळवा, मुंब्रा भागातील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यासाठी रेल्वेने मोठी घोषणा करत कळवा, मुंब्रा भागातील झोपडपट्टीवासीयांना सात दिवसांची नोटीस बजावली होती. या नोटीसीनुसार मुंबईतील ३०-३५ लाख झोपड्या तोडाव्या लागणार होत्या अशाने गरीबांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला होता.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या ठाण्यातील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणांबाबत प्रश्नावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी ( Union Minister of State for Railways Raosaheb Danve)  मोठी घोषणा केली असून ठाण्यातील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण तूर्तास उठवणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. १३ फेब्रुवारीला बैठक होणार असून या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. रावसाहेब दानवे हे एबीपी माझाशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ठाण्यातील कळवा, मुंब्रा भागातील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यासाठी रेल्वेने मोठी घोषणा करत कळवा, मुंब्रा भागातील झोपडपट्टीवासीयांना सात दिवसांची नोटीस बजावली होती. या नोटीसीनुसार मुंबईतील ३०-३५ लाख झोपड्या तोडाव्या लागणार होत्या अशाने गरीबांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला होता. रेल्वेच्या या निर्णयानंतर असंतोषाची लाट उसळली होती मात्र याच पार्श्वभूमीवर अतिक्रमण तूर्तास उठवणार नसल्याची महत्त्वाची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

मुंबईतील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण उठवण्याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले की, गेली अनेक वर्ष रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. ही जागा रेल्वेची असल्याने अतिक्रमण काढावे अशा सूचना सुप्रीम कोर्टाच्या आहेत. मात्र आता ते अतिक्रमण काढले तर आजच्या तारखेला त्या झोपडपट्टी धारकाची दुसरीकडे कोठेही व्यवस्था झालेली नाही. म्हणून १३ फेब्रुवारीला मी मुंबईत जाऊन सर्व लोकप्रतिनिधींना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नोटीस जरी सात दिवसांची असली तरी कोणतेही अतिक्रमण उठणार नाही असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. १३ तारखेला बैठक घेऊन आम्ही लोकांना दिलासा देणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

रेल्वेलगतच्या  झोपडीधारकांसाठी छातीचा कोट करुन उभा राहिन – गृहनिर्माण मंत्री

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत कळवा मुंब्रा वासीयांच्या निवाऱ्यासाठी ते त्यांच्या पाठिशी उभे राहिले होते. कळवा मुंब्रा वासीयांच्या निवाऱ्याचा हक्क जर कोणी काढून घेत असेल तर मी छातीचा कोट करुन उभा राहिन, असे वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मी छातीचा कोट करून उभा राहीन, रेल्वेच्या झोपडीवासीयांच्या नोटीशीला जितेंद्र आव्हाड यांचे उत्तर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -